Rohit Pawar
Rohit Pawar  Esakal
महाराष्ट्र

Rohit Pawar : PM मोदींच्या दौऱ्यावर रोहित पवारांचं सूचक वक्तव्य; 'आता BMC निवडणूक....'

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईत बीकेसी मैदानावर मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सभेमध्ये मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. (PM Narendra Modi's Mumbai Visit)

दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावर शिंदे फडणवीस सरकारवर विरोधक हल्लाबोल करत आहे. महाविकास आघाडीने केलेल्या कामाचे श्रेय शिंदे फडणवीस सरकार घेत आहे अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर मोदी यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

हे ही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आलेत आणि त्यामुळे आता लवकरच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस मधून आले आहेत तर त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी मोठे प्रकल्प राज्यात कसे येतील याकडे लक्ष्य द्यावं. नाशिक, नागपूरमध्ये उद्योग सुरू करावेत. तिथे संधी आहेत. तिथे विमानतळ आहेत. आपल्या राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्यापेक्षा हे दोन्ही प्रकल्प आपल्याकडे कसे देतील हे पाहावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी असं ते म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT