Roshni Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Roshni Shinde : रोशनी शिंदे गर्भवती नाही; शिवसेनेचा दावा खरा ठरला, तपासानंतर डॉक्टर म्हणाले....

त्या गर्भवती नाहीत, असा दावा शिवसेनेकडूनही करण्यात आला होता.

वैष्णवी कारंजकर

ठाकरे गटाच्या एका गर्भवती महिला कार्यकर्तीवर शिवसेनेच्या महिलांनी हल्ला केल्याने सध्या खळबळ उडाली आहे. मात्र ही महिला गर्भवती नव्हतीच तसंच तिला कोणत्याही प्रकारची मारहाण झाल्याचं आढळलं नाही, असं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.

ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिलेला मारहाण झाल्याचं सांगण्यात येत होतं. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही दाखवण्यात आले होते. यानंतर रोशनीला रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. मात्र आज सकाळी तिच्यावर उपचार कऱणाऱ्या डॉ. उमेश आळेगावकर यांनी ती गर्भवती नाही, तसंच तिच्या शरीरावर कोणतीही जखम नाही, गंभीर मारहाण झालेली नाही, असं सांगितलं आहे.

डॉ. आळेगावकर म्हणाले, "काल रात्री १०.३० च्या सुमारास रोशनी शिंदे सिव्हील रुग्णालयातून माझ्या रुग्णालयामध्ये दाखल झाल्या. त्यांना गंभीर मारहाण झालेली नाही. त्यांच्या पाठीवर मुक्या माराच्या हलक्या खुणा आढळल्या आहेत. सोनोग्राफी केली, मात्र कोणतीही अंतर्गत जखम, रक्तस्राव आढळून आला नाही.

डॉक्टर पुढे म्हणाले, "आम्ही रात्री या महिलेच युरिनरी प्रेग्नन्सी टेस्ट केली. ती निगेटिव्ह आली, त्यानंतर पुन्हा १२ तासांनी युरिनरी प्रेग्नन्सी टेस्ट केली तीही निगेटिव्ह आली. त्यामुळे सध्या तरी ती गर्भवती आहे, असं म्हणता येणार नाही. तिला कोणतेही फ्रॅक्चर नाही, किंवा जखमही झालेली नाही. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, राज्यपाल रात्री अचानक गेले राज्याबाहेर; काँग्रेससमोर पेच?

Rajat Patidar: आरसीबी फायनलमध्ये! पाटीदारच्या 'त्या' एका निर्णयामुळे गुजरात टायटन्स भुईसपाट; नेमकं काय घडलं?

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT