rpi Ramdas Athawale on BJP chandrakant patil controversial statement  
महाराष्ट्र बातम्या

Chandrakant Patil : 'भीक' शब्दाने भाजपमध्येच मतभेद! केंद्रीय मंत्र्याने चंद्रकांत पाटलांना सुनावलं

सकाळ डिजिटल टीम

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद सर्वत्र पडल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी काल चिंचवड येथे पाटील यांच्यावर शाईफेकीचा प्रकार देखील घडला. दरम्यान याप्रकरणी भाजपमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत.

केंद्रात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.

रामदास आठवले यांनी ट्विट करत भीक या शब्दाचा केलेला वापर अत्यंत चुकीचा आहे. सामाजिक क्रांती करणाऱ्या महापुरुषांचा अवमान आहे. आम्हाला चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या नेत्यांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी आपले शब्द मागे घ्यावेत समाजाप्रती दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

दुसऱ्या एका ट्विट मध्ये रामदास आठवले म्हणाले आहेत की, "तू मागू नकोस भीक .. तू शीक असाच संदेश महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा होता. दलीतमुक्तीचा लढा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारला. त्यांचे जीवन आणि समग्र कार्य हे स्वाभिमानावर आधारलेले आणि स्वाभिमानाची शिकवण देणारे आहे."

चंद्रकांत पाटील काय म्हणाले..

चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत, असं विधान केलं. यानंतर त्यांच्या या विधानाचे सर्वत्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT