cash sakal
महाराष्ट्र बातम्या

महापालिकेच्या प्रत्येक नगरसेवकाला १४.२१ लाख रुपये! महापालिकेचे उत्पन्न ७७३ कोटींपर्यंत; १९ फेब्रुवारीला पहिली सर्वसाधारण सभा, बजेट कधी?, वाचा...

शासन निर्णयानुसार महापालिकेच्या अपेक्षित महसुली उत्पन्नाच्या दोन टक्के निधीतून प्रत्येक नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी समान प्रमाणात वॉर्डवाईज निधी दिला जातो. २०२६-२७ वर्षाचे अंदाजपत्रक गतवर्षीप्रमाणे साधारणत: १२८३ कोटींचेच असणार आहे. त्यात महापालिकेचा ७७३ कोटींचा निधी आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शासन निर्णयानुसार महापालिकेच्या अपेक्षित महसुली उत्पन्नाच्या दोन टक्के निधीतून प्रत्येक नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी समान प्रमाणात वॉर्डवाईज निधी दिला जातो. २०२६-२७ वर्षाचे अंदाजपत्रक गतवर्षीप्रमाणे साधारणत: १२८३ कोटींचेच असणार आहे. त्यात महापालिकेचा ७७३ कोटींचा निधी आहे. यातील दोन टक्के व त्यानुसार महापालिकेतील एकूण १०२ संख्या असलेल्या प्रत्येक नगरसेवकास १४ लाख २१ हजार रुपयांचा निधी मिळू शकतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

चार वर्षांच्या प्रशासकराजनंतर महापालिकेला नवे कारभारी मिळाले आहेत. नव्या कारभाऱ्यांनाही आता महापालिकेकडून, स्थानिक आमदारांकडून व राज्य सरकारच्या माध्यमातून प्रभागातील विकासकामांसाठी निधी हवा आहे. अनेकांनी प्राधान्याने कोणती कामे करायची याची यादी देखील तयार केली आहे. परंतु, २०२५-२६ च्या आर्थिक वर्षातील शेवटचे दोन महिने राहिल्याने त्यांना चालू आर्थिक वर्षात निधी मिळणार नाही. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पानंतर नगरसेवकांना विकासनिधी मिळेल.

दरवर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीपूर्वी सादर होतो, पण महापालिकेचे महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी अजून झाल्या नसल्याने बजेट ३१ मार्चपर्यंत लांबणीवर पडू शकते. दरम्यान, केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या जीएसटी अनुदानातूनच (दरमहा अंदाजे २६ कोटी रुपये) १० वर्षांपासून महापालिकेचा कारभार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नव्या कारभाऱ्यांना विकासकामे करतानाच महापालिकेच्या तिजोरीत पैसे शिल्लक राहतील, यासाठी १०० टक्के करवसुली व वार्षिक उत्पन्नवाढीसाठी देखील प्रयत्न करावा लागेल, अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे.

नव्या नगरसेवकांसाठी...

  • प्रभागातील विकासकामे करताना तेथील काम सुरू करण्यापूर्वीचा आणि काम झाल्यावर काढलेला जिओ टॅगिंग फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे.

  • पूर्वीच्याच कामाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वार्षिक निविदा काढली जाते. त्यानुसार नियुक्त कंत्राटदार महापालिकेच्या आदेशानुसार कामे करतात.

  • नवीन कामासाठी निविदा निघते. १० लाखांवरील कामांसाठी ई-निविदा तर त्यापेक्षा कमी निधीच्या कामासाठी ऑफलाईन (लिफाफा) निविदा मागविल्या जातात.

पहिली सर्वसाधारण सभा १९ फेब्रुवारीला

निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सदस्यांची एका महिन्यात पहिली सर्वसाधारण सभा होऊन सर्व निवडी होणे आवश्यक असते. त्यानुसार महापालिकेच्या सर्व नगरसेवकांची १९ किंवा २० फेब्रुवारी रोजी पहिली सर्वसाधारण सभा होईल, असे महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. या सभेत स्थायी समितीसह सर्व निवडी होतील. त्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात होईल. दरम्यान, २८ फेब्रुवारीपूर्वी बजेट सादर करायचे असते, पण त्यासाठी शासनाकडून मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. तरीपण, ३१ मार्चपूर्वी बजेट सादर होणे अपेक्षित असते. सभागृहाच्या निर्णयानुसार वेळेत बजेट सादर होईल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

सोलापूर महापालिकेची वार्षिक स्थिती...

  • वार्षिक अंदाजपत्रक

  • १२८३ कोटींपर्यंत

  • महापालिकेचे अपेक्षित उत्पन्न

  • ७७३ कोटी

  • नगरसेवकांचा वॉर्डवाईज निधी

  • १५ कोटी

  • १०२ नगरसेवकांचा वार्षिक निधी

  • प्रत्येकी १४.१७ लाख रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT