earn and learn sakal
महाराष्ट्र बातम्या

‘कमवा व शिका’तून विद्यार्थ्यांना प्रतितास ४० रुपये! अशी होते 'पदव्युत्तर'च्या गरजू विद्यार्थ्यांची निवड

पदव्युत्तर विभागातील दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्याला शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ नयेत, म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘कमवा व शिका’ योजना सुरू आहे. यंदा १२ लाखांची तरतूद असून त्याअंतर्गत सध्या ६९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : विद्यापीठातील पदव्युत्तर विभागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्याला शिक्षण घेताना काही अडचणी येऊ नयेत, म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘कमवा व शिका’ योजना सुरू आहे. यंदा १२ लाखांची तरतूद असून त्याअंतर्गत सध्या ६९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे कमवा व शिका योजना राबविली जाते. डॉ. केदारनाथ काळवणे यांनी प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ व्हावा, यासाठी पुढाकार घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३मधील ६९ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. प्रतिवर्षी कुलगुरूंनी निवडलेल्या समितीकडून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्या मुलांना दिवसातून दोन तास काम दिले जाते. प्रत्येक तासाला ४० रुपये दिले जातात.

योजनेतील विद्यार्थ्याला दरमहा साधारणतः दोन हजार रुपये योजनेतून मिळतात. श्रमाचे महत्त्व वाढावे, विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्ध्यातून सोडायला लागू नये हा योजनेचा मुख्य हेतू आहे. अर्ज केलेल्यांपैकी ९५ ते ९९ टक्के मुलांना लाभ दिला जातोच. विद्यापीठातील विविध विभागांमध्ये दहा हजारांवर विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेतात, पण त्यातील खूप कमी विद्यार्थी ‘कमवा व शिका’चा लाभ घेतात, हे विशेष.

योजनेत सहभागी होण्यासाठी

  • - निवड समितीकडून निवडले जातात ‘कमवा व शिका’चे लाभार्थी

  • - मुलाखतीतून निवड, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजूंची निवड

  • - ‘कमवा व शिका’तून विद्यार्थ्याला तासाला ४० रुपये मिळतात

  • - प्रवेश घेतल्यापासून परीक्षा होईपर्यंतचा खर्च भागेल अशी योजना

  • - योजनेतून विद्यार्थ्याचा वर्षाचा मेस, हॉस्टेल, परीक्षा शुल्कचा खर्च भागतो

गरजूंनी योजनेचा आवर्जुन लाभ घ्यावा

कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कमवा व शिका’ योजना विद्यापीठाकडून प्रभावीपणे राबविली जात आहे. विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गरज पाहून त्यांना लाभ दिला जातो.

- केदारनाथ काळवणे, संचालक, विद्यार्थी विकास विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून टीका; मनोज जरांगे पाटलांनी कराडच्या सभेत दिलं थेट उत्तर, म्हणाले...

Alephata Crime : मानसिक छळामुळे तरुणीने संपविले जीवन; शिक्षकावर गुन्हा दाखल

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर अपघात; एन्डेवर चालक व दूचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT