rss ideology acceptable to the bjp uddhav thackerays question to bjp  esakal
महाराष्ट्र बातम्या

संघाची विचारसरणी भाजपला मान्य आहे का? ठाकरेंचा भाजपला सवाल

राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड पाहायला मिळाली. शिंदे गटाने बंग पुकारल्यानंतर शिवसेनेने संभाजी ब्रिगेडचा हात पकडला आहे.

धनश्री ओतारी

राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड पाहायला मिळाली. शिंदे गटाने बंग पुकारल्यानंतर शिवसेनेने संभाजी ब्रिगेडचा हात पकडला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज या युतीची घोषणा केली. दरम्यान, त्यांनी भाजवरही हल्लाबोल केला.(rss ideology acceptable to the bjp uddhav thackerays question to bjp)

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीची घोषणा केली. आणि भाजपवर निशाणा साधत संघाची विचारधारा भाजपला मान्य आहे का? असा सवाल उपस्थित केला.

आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत युती केली होती. भाजपचा पितृपक्ष असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक विचार आहे, पण त्या संघाचाच विचार भाजप मानत नाही. संघाची विचारसरणी भाजपला मान्य आहे का? त्याप्रमाणे वागत आहेत का? असे सवाल ठाकरेंनी यावेळी भाजपला उपस्थित केला.

तसेच, मोहन भागवतांनी गेल्या काही वर्षात जी मते मांडली आहेत, त्याप्रमाणे भाजप काम करत आहे का, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे विचारधारा वगैरे आम्हाला विचारण्याऐवजी त्यांना विचारावी,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT