RTE admission sakal
महाराष्ट्र बातम्या

‘RTE’ प्रवेश १ मार्चनंतर! १,०१,८८१ विद्यार्थ्यांना मिळणार नामवंत इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश

आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बुधवारनंतर (ता. १) सुरवात होणार असून प्रवेशावेळी आधार कार्ड बंधनकारक नसणार आहे. तरीपण, संबंधित पालकांनी आपल्या मुलांचे आधार कार्ड काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बुधवारनंतर (ता. १) सुरवात होणार असून प्रवेशावेळी आधार कार्ड बंधनकारक नसणार आहे. तरीपण, संबंधित पालकांनी आपल्या मुलांचे आधार कार्ड काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत आठ हजार ८२० शाळांनी नोंदणी केली असून, त्यात एक लाख एक हजार ८८१ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. पालकांनी अर्ज भरल्यानंतर, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे केली जाणार आहे. पडताळणी यशस्वी झाल्यानंतर, पालकांना संबंधित शाळेत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा होईल. शाळेत कोणत्याही प्रकारची कागदपत्रांची पडताळणी होणार नाही.

ऑनलाइन भरलेली माहिती चुकीची असणार नाही, याची पालकांनी खबरदारी घ्यावी, अन्यथा प्रवेश रद्द होऊ शकतो. प्रवेशावेळी नव्हे पण प्रवेशानंतर काही दिवसांनी संबंधित मुलाला आधार कार्ड त्या शाळेत जमा करावेच लागणार आहे. आधार कार्ड न दिल्यास काही दिवसांनी प्रवेश रद्द होऊ शकतो आणि प्रतीक्षेतील मुलास तेथे संधी दिली जाईल.

त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाचे आधार कार्ड वेळेतच काढून ठेवणे आवश्यक आहे. दरम्यान, ‘एनआयसी’कडून प्रवेशासंबंधीचा डेमो झाल्यानंतर प्रवेशाला सुरवात होणार असून प्रवेश प्रक्रिया लांबली असली तरीदेखील प्रवेशासाठी तेवढा वाढीव वेळ दिला जाणार आहे.

‘या’ संकेतस्थळावरून भरा असा प्रवेश अर्ज

  • सुरवातीला https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या शासकीय वेबसाइटवर जाऊन अर्ज करा

  • सर्वप्रथम विद्यार्थ्याची नोंदणी करा, पुन्हा जुना पासवर्ड बदलून नवीन पासवर्डने लॉगिन करा

  • विद्यार्थ्याची मूळ माहिती भरून अर्जातील सर्व माहिती भरा

  • अर्जातील माहिती भरून झाल्यावर शाळेची निवड करा

  • शेवटी अर्जातील संपूर्ण माहिती अचूक असल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा

प्रवेशावेळी लागणारी कागदपत्रे

  • रहिवासी पुरावा (रेशनकार्ड, आधार कार्ड, वीजबिल, राष्ट्रीयीकृत बॅंक पासबुक)

  • वंचित जात संवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र

  • दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न)

  • जन्माचा दाखला

कोणत्याही अमिषाला बळी पडू नका

मोफत आरटीई प्रवेश प्रक्रिया लॉटरी पद्धतीने पार पडते. कोणात्याही व्यक्तीच्या अमिषाला पालकांनी बळी पडू नये. ऑनलाइन पद्धतीने पार पडणारी ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. त्यात प्रतीक्षा यादी देखील प्रसिद्ध केली जाते. कागदपत्रांची छाननी करूनच प्रवेश दिला जातो. अर्ज भरतानाच पत्ता अचूक असावा.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

  • सोलापूर जिल्ह्यातील आरटीई प्रवेश

  • तालुका शाळा प्रवेश क्षमता

  • अक्कलकोट १४ ११५

    बार्शी २३ २६५

  • करमाळा २८ १०६

  • माढा ३६ २३७

  • माळशिरस ५१ ३१२

  • मंगळवेढा १२ ९४

  • मोहोळ १६ ११९

  • पंढरपूर ४७ ३४८

  • सांगोला २१ १५०

  • उ. सोलापूर २० १५२

    द. सोलापूर १० ९८

  • सोलापूर शहर १७ २०१

  • एकूण २९५ २,२९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT