RTE admission sakal
महाराष्ट्र बातम्या

‘RTE’चे प्रवेश मे महिन्यातच! सर्वच शाळांची नोंदणी पूर्ण, आता पुढचा टप्पा शाळांच्या मॅपिंगचा; घरापासून 1KM अंतरावरील शाळेतच विद्यार्थ्यांना प्रवेश

आरटीई प्रवेशातील बदलानुसार खासगी अनुदानित, अशंत: अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांसह खासगी इंग्रजी शाळांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यानंतर सर्व शाळांमधील अंतर (मॅपिंग) नेमके किती, याचे ऑनलाइन मोजमाप होईल. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : दरवर्षी डिसेंबर- जानेवारीत सुरू होणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया मार्च संपत आला तरीदेखील सुरू झालेली नाही. आरटीई प्रवेशातील नवीन बदलानुसार सध्या खासगी अनुदानित, अशंत: अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांसह खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची नोंदणी करून घेण्यात आली आहे. त्यानंतर आता सर्व शाळांमधील अंतर (मॅपिंग) नेमके किती आहे, याचे ऑनलाइन मोजमाप होईल. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून ‘आरटीई’अंतर्गत इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश मोफत मिळणार नाहीत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किमी अंतरावरील शासकीय किंवा अनुदानित, अशंत: अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावर शासकीय किंवा खासगी अनुदानित शाळा नाही त्या विद्यार्थ्यांना त्या परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याची मुभा असणार आहे. पण, शाळांच्या मॅपिंगमुळे त्या विद्यार्थ्याच्या घरापासून एक किमी अंतरावर खरोखरच शासकीय शाळा नाहीत, याची खात्री केली जाणार आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यातील १४ शाळांची नोंदणी अजून झाली नसून त्याची कार्यवाही सुरु आहे.

दरम्यान, ‘आरटीई’अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार ३९८ शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून आता या सर्व शाळांचे मॅपिंग होईल. त्यानंतर ‘आरटीई’तून प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवून घेतले जातील. विद्यार्थ्यांना शाळांचा प्राधान्यक्रम द्यावा लागेल आणि त्यानुसार त्यांना संबंधित शाळांमध्ये प्रवेश मिळतील. प्रवेशाची प्रक्रिया सुरु होण्यासाठी आणखी किमान एक महिन्याचा अवधी लागेल, अशी सद्य:स्थिती आहे. मे महिन्यात प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

तालुकानिहाय शाळांची संख्या

तालुका शाळा

  • करमाळा २६५

  • मंगळवेढा २०७

  • मोहोळ २६६

  • द.सोलापूर २०८

  • माळशिरस ४५५

  • पंढरपूर ४१४

  • माढा ३३९

  • उत्तर सोलापूर १४७

  • अक्कलकोट २८९

  • बार्शी २५०

  • सांगोला ४१४

  • सोलापूर शहर १४४

  • एकूण ३३९८

नोंदणी झाली, आता शाळांचे मॅपिंग आणि मग प्रवेश

‘आरटीई’ प्रवेशाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. आता त्या शाळांचे शासन स्तरावरून मॅपिंग होईल. त्यानंतर काही दिवसांत ‘आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू होतील. पण, प्रवेशासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून काही माहिती मिळालेली नाही.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT