Pandharpur Wari  esakal
महाराष्ट्र बातम्या

Pandharpur Wari : रुक्मिणी मातेची पालखी पहिल्यांदाच पंढरपुरात; विठुरायाच्या सासुरवाडीच्या पालखीने पंढरपूर दुमदुमले

संतोष कानडे

पंढरपूरः येत्या बुधवारी आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून निघालेल्या शेकडो पालख्या पंढरपुरात दाखल होत आहेत. यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरामध्ये दाखल झाली आहे.

मानाची रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरात दाखल झाली असून अमरावतीच्या कोंडीन्यपूर येथून पालखी पंढरपुरात दाखल झाली आहे. ७०० किमीचा प्रवास करून विठुरायाच्या सासुरवाडीची पालखी आल्याने पंढरपूरमध्ये भक्तिमय वातावरण होते.

आषाढी यात्रेसाठी आता मानाच्या पालख्यांचे पंढरपुरात आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. विठ्ठलाच्या सासरची अर्थात रुक्मिणी मातेच्या माहेरची कौंडण्यपूर येथील मानाची पालखी रविवारी पंढरपुरात दाखल झाली. ७०० किलोमीटरचा प्रवास करत रुक्मिणी मातेचा पालखी सोहळा पंढरपूरला आला आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा गजर करत पालख्या दाखल झाल्या आहेत.

संत मुक्ताई यांची पालखी पंढरपुरात दाखल

मानाच्या संताच्या पालख्यामध्ये असणारी संत मुक्ताई यांची पालखी रविवारी पंढरपूर येथे दाखल झाली. मुक्ताईनगर जळगाव येथून ३५ दिवसांचा प्रवास करून ही पालखी पंढरपूर येथे दाखल झाली आहे. आता आषाढीच्या वेध लागले असताना पहिल्यांदाच प्रमुख संतापैकी संत मुक्ताई पंढरपूर नगरीत दाखल झाल्या आहेत. ही पालखी आता पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात वास्तव्यास असेल तर बंधू भेटीसाठी ही पालखी १६ जुलै रोजी वाखरी येथे जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Council Election: पुण्याच्या जागेसाठी भाजप आक्रमक! विधान परिषद निवडणुकीसाठी नेत्यांकडून वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी

Trump Declassifies Hidden UFO Files : आकाशातील गूढ की लष्करी गुपिते? ट्रम्प यांनी अखेर उघडला अतिगोपनीय यूएफओ फायलींचा खजिना!

Quick Indian Fusion Breakfast Idea: झटपट आणि चविष्ट बनणारा 'Smashed Aloo Tikki Tacos’ तुम्ही कधी ट्राय केलं का? लगेच रेसिपी लिहून घ्या

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

SCROLL FOR NEXT