solapur news
solapur news  sakal
महाराष्ट्र

जमीन-जागा खरेदी- विक्रीचे नियम! अल्पवयीनच्या नावावरील जागा, जमीन विकता येते, पण...; ‘या’ व्यक्तींना घरी बसूनही विकता येते मालमत्ता, वाचा काय आहेत नियम

तात्या लांडगे

सोलापूर : कुटुंबातील असो की बाहेरील १८ वर्षांखालील मुलामुलींच्या नावे जागा, जमीन केल्यास त्या मुलांचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत ती मालमत्ता विकता येत नाही. त्यासाठी न्यायालयातून परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, वारसा हक्काने एखादी मालमत्ता नावे झाली असेल आणि त्यात संबंधित व्यक्तीचे नाव असल्यास ती मालमत्ता विकता येते. दुसरीकडे आजारपणामुळे खरेदी किंवा विक्रीसाठी येवू शकत नसल्यास त्या व्यक्तीच्या घरी जाऊन परवानगी घेण्याची देखील सोय असल्याची माहिती मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी गोविंद गिते यांनी दिली.

आर्थिक अडचणींमुळे अनेकजण जमीन, जागा विकण्याचा प्रयत्न करतात, पण त्यावेळी त्या जागा किंवा जमिनीवरील अल्पवयीन मुला-मुलींच्या नावांचा अडथळा येतो. अशावेळी अडचण तर गंभीर आहे अन्‌ मुले-मुली अल्पवयीन असल्याने मालमत्ताही विकता येत नाही. त्यामुळे समोरील व्यक्तीच्या अडचणी वाढतात, पण त्यावेळी न्यायालयाचा दरवाजा उघडा असतो. न्यायालयात संबंधित व्यक्तीने रीतसर अर्ज करून परवानगी मागितल्यास त्याठिकाणी अडचणींचा विचार होतो आणि परवानगी दिली जाते. विक्री केलेल्या मालमत्तेतून आलेल्या रकमेतील काही रक्कम त्या अल्पवयीन मुलांच्या भविष्यासाठी ठेवावी लागते. दुसरीकडे एखाद्यावेळी अल्पवयीन मुलांची नावे उताऱ्यावर आहेत, पण विक्री करणाऱ्याचेही नाव उताऱ्यावर आहे. त्यावेळी मात्र परवानगीची आवश्यकता लागत नाही.

ठळक बाबी...

  • १) वडिलोपार्जित जमीन, मालमत्ता आहे आणि वडिलांच्या निधनानंतर त्या मालमत्तेवर मुलांची नावे वारसा हक्काने आली आणि त्यावर मृताच्या पत्नी किंवा ज्यांची नावे आहेत त्यांना ती मालमत्ता विकता येते.

  • २) आपण स्वतः: काही स्थावर मालमत्ता विकत घेतली असेल आणि ती जागा- जमीन अल्पवयीन मुलामुलींच्या (१८ वर्षांखालील) नावे केली व काही दिवसांनी अडचण आल्यास ती विकायचे ठरवल्यास त्यासाठी कोर्टाची परवानगी बंधनकारक असते.

  • ३) अल्पवयीन मुलाचा सांभाळ करणारे कोणी मामा, काका असे नातेवाईक असल्यास त्यांना अल्पवयीन मुलाच्या नावावरील जमीन- जागा विकायची असल्यास त्यासाठी संबंधितास न्यायालयाची परवानगी लागतेच. पण, त्यावेळी मात्र तो अल्पवयीन मुलगा-मुलगी १८ वर्षांचा होईपर्यंत त्याचा सांभाळ, आरोग्य, शिक्षणावर खर्च करण्यास तयार असल्याचे लेखी द्यावे लागते.

...त्या व्यक्तींना घरी बसून विकता येईल मालमत्ता

ज्येष्ठ ज्यांना उठता, बसता येत नाही किंवा खूपच आजारी असलेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांची परवानगी घेतली जाते. तत्पूर्वी, त्यासाठी त्या व्यक्तीचे वैद्यकीय प्रमाणपत्र, मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र जोडून दुय्यम निबंधक कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर दुय्यम निबंधक वेळ देऊन त्या व्यक्तीच्या घरी भेट देतात. त्यावेळी तेथे परवानगी (स्वाक्षरी) घेताना व्हिडिओ शूटिंग काढली जाते. तो व्हिडिओ महसूलच्या सर्व्हरवर अपलोड केला जातो. त्यानुसार संबंधित मालमत्तेची खरेदी किंवा विक्री होते. पण, त्या अधिकाऱ्यांचा वाहनाचा खर्च संबंधित व्यक्तीला द्यावा लागतो.

खरेदी- विक्री व्यवहाराची स्वतंत्र नियमावली

अल्पवयीन मुला-मुलींच्या नावे असलेली जमीन त्यांच्या नातेवाइकांना विकायची असल्यास न्यायालयाची परवानगी बंधनकारक आहे. दुसरीकडे एखादा व्यक्ती आजारपणामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्रीसाठी येवू शकत नसल्यास त्यांच्या घरी जाऊन संबंधित व्यक्तीची स्वाक्षरी घेतली जाते. त्यासाठी स्वतंत्र पद्धती आहे.

- गोविंद गिते, मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

SCROLL FOR NEXT