Rupali chakankar and  
महाराष्ट्र बातम्या

Rupali Chakankar : राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण...; शिंदे गटाच्या आमदाराची चाकणकरांनी काढली खरडपट्टी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्याच्या राजकारणात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु आहेत, तर दुसरीकडे मंत्रीपदं आणि पालकमंत्री पदांसाठी महायुतीमध्ये चढाओढ दिसुन येत आहे. तर अजित पवार गट, भाजप, शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. मात्र त्याआधीच वाद सुरू झाले आहेत.

मंत्रीपदासाठी इच्छूक आमदार भरत गोगावले यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गोगावलेंची खरडपट्टी काढली.

चाकणकर यांनी ट्विट करून म्हटलं की, आज एका ठिकाणी बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आम्ही त्यांच्यापेक्षा म्हणजे आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना?? असं वक्तव्य केल्याचं निदर्शनास आले.

राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती मंत्रीपदावर विराजमान असलेली असो किंवा ती सामान्य गृहिणी असो ती आज कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाही. आपल्या या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे.

भरतजी, आपण त्या जिल्ह्यातून येता जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो. जिथे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीची स्थापना केली. ज्या रायगडच्या राजाने महिलांच्या सन्मानाला जीवापाड जपलं, आपण त्या रायगडमधून येता, जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली पत्नी येसूबाई यांना 'सखी राज्ञी जयती' असा सन्मान करून अनुपस्थित राज्यकारभार करण्याचा हक्क दिला. त्यामुळे महिलांच्या सन्मानाची जाणीव सर्वात जास्त तर आपल्याला असायला हवी. आपण केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करते, अशा शब्दात चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT