Rupali Chakankar esakal
महाराष्ट्र बातम्या

कोरोनानंतर राज्यात बालविवाहाचे वाढले प्रमाण: रूपाली चाकणकरांची माहिती

राज्यातील वाढत्या बालविवाहाचे प्रमाण रोखण्यासाठी चाकणकरांनी केले आवाहन

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : राज्यात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. हे रोखण्यासाठी आता मोठी चळवळ उभी करावी लागणार आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवकांचा समावेश या मोहिमेत करून घेऊन मोहिम चालवावी अशी शिफारस पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे (Shailesh Balkawade) यांच्याकडे केली आहे. या चळवळीत लोकप्रतीनिधींनी सहभागी व्हावे असे आवाहन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केले. बालविवाहाच्या घटना घडूच नयेत यासाठी कोल्हापुर पोलिस चांगल्या पध्दतीचे काम करत आहे असे कौतुक चाकणकर यांनी केले. आज त्यांनी कोल्हापूर पोलिस आयुक्त कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दोन वर्षाच्या कालावधीत जसे आपण कोरोना महामारी विरोधात लढलो आणि जिंकलोही. मात्र या आजारासोबत अनेक समस्या निर्माण झाल्या.

बालविवाहाचे प्रमाण वाढण्याचे कारण

दोन वर्षाच्या कालावधीत जसे आपण कोरोना महामारी विरोधात लढलो आणि जिंकलोही. मात्र या आजारासोबत अनेक समस्या निर्माण झाल्या. यातील महत्वाची समस्या म्हणजे बालविवाह. यामध्ये मुलीच्या नावाची खोटी नोंद करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचसोबत कोठेही नोंद न करता बालविवाहाचे प्रमाण देखील वाढले आहे. कोरोना काळात घरातील कर्ता पुरुष गेल्याने हे प्रमाण वाढले असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली.

महिला आयोगाने महाराष्ट्र शासनाला केली शिफारस

पुढे त्या म्हणाल्या, बालविवाहाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १४ व्या, १५ व्या वयातच मुलींचा विविह होतो. त्यानंतर बाळंतपण लादले जाते. मुलींची शाररीक आणि मानसिक वाढ न झाल्याने त्यांचे मृत्यू होण्याचेही प्रमाण यामुळे खूप वाढले आहे.या सर्वाचा अभ्यास करून यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य महिला आयोगाने महाराष्ट्र शासनाला शिफारस केली आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००७ नुसार, बालविविह करून देणारे मुलाचे आणि मुलीचे आई-वडील, मंगलकार्यालय, भटजी आणि फोटोग्राफर यांच्यावर गुन्हा नोंद होत होता. पण या कायद्यात बदल करून ज्या ग्रामपंचायतीमध्ये हा बालविवाह होतो त्या ग्रामपंचायचीचे सरपंच, सदस्य आणि बाल विवाहाची खोटी नोंद करणारे अधिकारी यांच्यावरील दोष सिध्द झाल्यास त्यांचे पद तात्काळ रद्द करून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी शिफारस महिला आयोगाने केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: सत्तारांचे पंख छाटण्यासाठी भाजपचा पहिला वार!;अब्दुल समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज बाद, स्वप्न भंगले; शिवसेनेच्या आमदार जाधव, अण्णासाहेब माने यांनाही धक्का

Latest Marathi News Live Update : अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर

Beed: दलदल, चिखलातून काढावा लागतोय मार्ग ;रस्ते चिखलात; पुरुषोत्तमपुरीत प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा भाविकांना फटका

Sangli Satara Election: स्वाभिमान दाखविल्यास निकाल बदलेल: जयंत पाटील, शशिकांत शिंदे; नाराजांची मदत घेणार, दोन्ही राजांनी स्वाभिमान दाखवावा

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचा केंद्र सरकारसह अदाणींना मोठा दणका; २० हजार कोटींच्या स्मार्ट मीटर प्रकल्प केला बंद

SCROLL FOR NEXT