Bandatatya Karadkar News Updates Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

बंडा तात्यांनी माफी मागितली, तरीही...; रुपाली चाकणकरांची प्रतिक्रीया

बंडा तात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सुधीर काकडे

बंडा तात्या कराडकर (Banda Tatya Karadkar) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही वेळापुर्वीच त्यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रीया दिली आहे. (Bandatatya Karadkar News Updates)

रुपाली चकणकर यांनी यावर बोलताना बंडा तात्यांनी केलेलं ते विधान वादग्रस्त आणि संतापजनक असल्याचं म्हटलं आहे. याबाबत महिलांनी तक्रारी केली असून, याची महिला अयोगाने गंभीर दखल घेतली असून, त्यांच्यावर 48 तासांत कडक कारवाई करावी अशी सुचना त्यांनी दिली आहे. तसंच बंडा तात्यांनी माफी मागितली असली तरी, त्यांनी केलेलं वक्तव्य हे निदंनिय असून, अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे कोणीही अशा प्रकारचं वक्तव्य केल्यास त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. पोलिसांनी महिला आयोगाला दोन दिवसात लेखी अहवाल दयावा असंही चाकणकरांनी सांगितलं आहे.

बंडा तात्यांच्या वक्तव्यावर अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) प्रतिक्रिया दिली आहे. स्त्रियांनी आपल्या देशात खूप भोगलेलं आहे. त्यांच्यावर टीप्पणी करणं चुकीचं वाटतं, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. कधीही कोणावर वैयक्तिक टिप्पणी करू नये. दोन गोष्टी वेगळ्या ठेवायला. वैयक्तीक टिप्पणी कोणावरही व्हायला नको. महाराष्ट्रात नेहमीच कोणी बोलल्यावर आंदोलन होतात. स्त्रियांच्या बाबतीत नेहमीच बोललं जातं. पण, आपल्याला मानसिकता बदलायची आहे, असंही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT