Rupali Chakankar Sakal
महाराष्ट्र बातम्या

रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

आज मुंबईत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिला असल्याची माहिती

दत्ता लवांडे

मुंबई : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष या पदाचा राजीनामा दिला आहे. आज मुंबईत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिला असल्याची माहिती मिळाली असून आता या पदावर पक्ष कुणाची नियुक्ती करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.(Rupali Chakankar resigns as NCP Women State President)

रुपाली चाकणकर सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. 'एक व्यक्ती एक पद' यामुळे त्यांनी आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचं बोललं जातंय. २०१९ साली चित्रा वाघ यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर रुपाली चाकणकरांना हे पद पक्षाकडून देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी या पदावर असताना नेटाने आपलं काम केलं होतं. अनेकजण पक्ष सोडून जात असताना त्यांनी आपल्या भाषणाच्या जोरावर राष्ट्रवादीचे ५४ आमदार निवडून आणण्यात हातभार लावला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान काही दिवसांपासून त्या आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती पण आज सायंकाळी ४ वाजता त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर असताना पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष होत होते त्यामुळे एका पदावर राहून काम करण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला असावा असं बोललं जातंय.

दरम्यान रुपाली चाकणकर या पुणे महानगरपालिकेत नगरसेविका होत्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या अगोदर चित्रा वाघ यांनी आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यावर पक्षाने ही जबाबदारी रुपाली चाकणकरांवर सोपवली होती. त्यांच्या या राजीनाम्यानंतर लवकरच या पदासाठी नवं नाव घोषीत केलं जाईल अशी माहिती मिळतीय. पण हे पद कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT