political esakal
महाराष्ट्र बातम्या

'मूळ नाव लपवून फिरणाऱ्या कराडकरांना संस्कार काय कळणार?'

संस्कार म्हणजे काय खरे मूळ नाव लपवून टोपण नावाने फिरणारे कराडकर यांना काय कळणार ?

सकाळ डिजिटल टीम

संस्कार म्हणजे काय खरे मूळ नाव लपवून टोपण नावाने फिरणारे कराडकर यांना काय कळणार ?

बंडा तात्या कराडकर (Banda Tatya Karadkar) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर टीका सुरु आहे. मुख्यमंत्र्यांविषयी (CM Uddhav Thackeray) केलेल्या वक्तव्यानंतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही झाली. दरम्यान, आता रुपाली ठोंबरे-पाटील (Rupali Thombare-Patil) यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत बंडा तात्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, काल लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात सुप्रिया सुळे या शरद पवारांना पायात बुट चढवतानाच्या या फोटोवर अनेक कमेंट्स येत आहेत. रुपाली ठोंबरे यांनी ट्वीटमध्ये हा फोटो पोस्ट केला असून यात त्या म्हणतात, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणार्‍या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी.. हे आहेत सुप्रिया सुळे यांच्यावरील शरद पवार यांचे संस्कार, असे म्हणत त्यांनी कौतुक केले आहे. दरम्यान, खरे मूळ नाव लपवून टोपण नावाने फिरणारे बंडा कराडकर (Banda karadkar) यांना संस्कार म्हणजे काय कळणार ?, असा टोला त्यांनी लगावला आहे.

बंडातात्या यांच्या वादग्रस्त विधानामुळे सध्या वाक् युद्ध रंगले आहे. महाराष्ट्राच्या भूमीत महिला अतिशय सक्षमपणे काम करत असताना कराडकर यांनी महिला प्रतिनिधी खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांची बदनामी करत समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणाऱ्या कराडकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. यापुढे महिला कर्तृत्वाची अशी नाहक बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला होता. दरम्यान भाजपाच्या (BJP) काही नेते त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Akbar: महिलेचं अपहरण करणं मुघलांना पडलं होतं महागात! औरंगजेबच्या पणजोबाची कबर खोदून हाडं कोणी जाळली?

Latest Marathi Breaking News : बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी - वनमंत्री गणेश नाईक

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

SCROLL FOR NEXT