sadabhau khot  esakal
महाराष्ट्र बातम्या

'कडकनाथ पुढाऱ्यास...', रुपाली ठोंबरे-पाटील यांचा सदाभाऊंना टोला

कडकनाथ पुढाऱ्यास एसटी कामगारांनी संपातून का हाकलावले याच चिंतन करावं?

सकाळ डिजिटल टीम

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून (Budget) राज्यांना नव्या आर्थिक वर्षामध्ये विविध योजनांसाठी निधीची तरतूद केली असल्याचं समोर आलं आहे. मात्र बऱ्याच महत्वाच्या क्षेत्रासांठी केंद्राने गाजर दाखवलं असल्याची आरोप सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांकडून झाला आहे. दरम्यान, शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनीही काल अर्थसंकल्पावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीवासी झाल्याने राऊतांना दिसतो बजेट आभासी, असे टोला त्यांनी लगावला होता.

सदाभाऊ खोत यांच्या या टीकेवर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी पलटवार केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे. यात त्या म्हणतात, संघटना झेंडा अन् दांड्यांसहित आमदारकीसाठी गहाण ठेवणाऱ्या "सदा" सर्वदा यांनी अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या कडकनाथ पुढाऱ्यास एसटी कामगारांनी संपातून का हाकलावले याच चिंतन करावं? असं म्हणत नाव न घेता सदाभाऊ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमेकांवर टीका सुरु असतात. काल सादर झालेल्या अर्थसंकल्पावरुनही निशाणा साधला जात आहे. काल सदाभाऊ खोत यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. याशिवाय सत्ताधारी पक्षातील जंयत पाटील यांनीही अर्थसंकल्पावरून अर्थसंकल्प नव्हे, निवडणूक संकल्प असा टोला लगावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT