पंढरपूर - भाविकांसाठी प्रसाद लाडवांचे पॅकिंग करताना कर्मचारी. 
महाराष्ट्र बातम्या

#SaathChal आषाढीत प्रसादासाठी दहा लाख लाडू

राजकुमार घाडगे

रोज 40 हजार लाडू होतात तयार; 45 कर्मचारी तैनात
पंढरपूर - आषाढी यात्रेसाठी पंढरीला येणाऱ्या भाविकांसाठी यंदा 10 लाख प्रसाद लाडू बनविण्यात येणार आहेत. भक्त निवास पसिरातील कारखान्यात लाडू बनविण्याची लगबग सुरू आहे.

आषाढी यात्रेला सुमारे दहा लाखाहून अधिक भाविक येण्याची शक्‍यता आहे. बहुसंख्य भाविक श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीने प्रसाद म्हणून विक्रीसाठी बनवलेले बुंदी लाडू व राजगिरा लाडू प्रसाद म्हणून आपल्या सोबत घेऊन जातात. त्यासाठी दरवर्षी मंदिर समितीकडून ठेकेदारामार्फत बुंदीचे लाडू व राजगिरा लाडू मोठ्या प्रमाणावर बनवण्यात येत असतात.

यंदादेखील सुमारे 10 लाख बुंदी लाडू बनवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दररोज 40 ते 45 हजार लाडू बनविण्यात येत आहेत. पाच आचारी बुंदी तयार करण्यासाठी, 20 महिला कर्मचारी लाडू बनविण्यासाठी, तर 20 महिला कर्मचारी लाडवांच्या पॅकिंगचे काम करीत आहेत. पॅकिंगसाठी आता प्लॅस्टिकऐवजी पर्यावरणपूरक बटर पेपरचा वापर करण्यात येत आहे. बुंदीचे 2 लाडू 15 रुपयांना, तर राजगिऱ्याचे लाडू 10 रुपयांना विक्री करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

Palghar Relief Hospital case: रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखे यांच्यासह २२ जणांना न्यायालयीन कोठडी; पोलिसांची अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

Sugar Factory Membership: कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना सभासदत्व बंद; साखर आयुक्तांच्या परिपत्रकामुळे भीमाशंकर कारखान्याच्या प्रस्तावाला ब्रेक

MNLU Nagpur VC Appointment: डॉ. ज्योती भाकरे यांची नागपूरच्या 'महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी'च्या (MNLU) कुलगुरूपदी निवड

राहुल द्रविडच्या पोराची २११ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी,ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई! आर्यवीर सेहवागच्या पदार्पणात २८ धावा

SCROLL FOR NEXT