Bhavana Gawali tied Rakhi to PM Narendra Modi esakal
महाराष्ट्र बातम्या

भावना गवळींचे पंतप्रधानांसोबत रक्षाबंधन आणि काँग्रेसचा सोमय्यांना टोला

भावना गवळी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

धनश्री ओतारी

काही दिवसांपूर्वी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या कचाट्यात सापडलेल्या खासदार भावना गवळी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. हाच मुद्दा पकडच काँग्रेस नेते सचिन सावंत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खोचक सवाल उपस्थित केला आहे.(Sachin Sawant reaction on Bhavana Gawali tied Rakhi to PM Narendra Modi)

भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. त्यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट टाकून याबाबतची माहिती दिली. याच क्षणाचा फोटो सचिन सावंत यांनी ट्विटवर शेअर केला. आणि त्यावरुन भाजप नेते सौमय्या यांच्यावर टोलेबाजी केली.(Sachin Sawant Kirit Somaiya)

'आता भावना ताईंच्या संरक्षणाची जबाबदारी स्वयं पंतप्रधानांनी घेतली आहे. यावर किरीट सोमय्या आपली विशेष टिप्पणी अपेक्षित आहे.... देणार का? 🤔' असा खोचक सवाल सावंत यांनी सौमय्यांना टॅग करत उपस्थित केला आहे. सध्या सावंत यांचे हे ट्विट राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या हे नेहमीच काँग्रेस शिवसेना नेत्यांना टार्गेट करत असतात. राज्यातील अनेक घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करत असतात.

सोशल मीडियावर भावना गवळी यांच्या या पोस्टची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. त्या शिवसेनेच्या इतर १२ खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या होत्या. गेल्या अडीच वर्षांच्या काळात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भावना गवळी यांच्यापाठी 'ईडी'चा ससेमिरा लागला होता. त्यांच्या एका निकटवर्तीयाला ईडीकडून अटकही करण्यात आली होती.

मात्र, शिंदे गटाने भाजपसोबत राज्यात सत्तास्थापन केल्यानंतर भावना गवळी यांच्यापाठी लागलेली 'ईडी-पीडा' दूर होईल, अशी चर्चा होती. अशातच इतके दिवस केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर असलेल्या भावना गवळी रक्षाबंधनाच्या दिवशी थेट पंतप्रधान मोदी यांनी राखी बांधायला पोहोचल्या. त्यामुळे आता भावना गवळी यांच्यापाठी लागलेले ईडीचं सावट दूर होणार का, याविषयी चर्चांना उत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT