महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh: वाझे व परमवीरला फडणवीसांनी उभे केले, अनिल देशमुखांचा आरोप !

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर मोटारीत बाँब ठेवले आणि नंतर गाडीच्या मालकाची हत्या केली

सकाळ डिजिटल टीम

Mumbai News: ‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरील आरोपाला उत्तर देण्यासाठी सचिन वाझे आणि परमवीर सिंग या दोन पोलिस अधिकाऱ्यांना पुढे केले असले तरी या मागचे खरे सूत्रधार हे फडणवीस हेच आहेत,’’ असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

‘एक्स’वरील पोस्टमध्ये ते म्हणाले, की ‘फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगांत टाकण्यासाठी कटकारस्थान रचले असल्याचा कटाचा खुलासा मी १५ दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या कटाची जाहीर वाच्यता जनतेसमोर केल्यावर त्यांनी माझ्यावर आरोप करण्यासाठी जो देशद्रोहाच्या व दोन खुनाच्या गुन्ह्यांमध्ये तीन वर्षांपासून तुरुंगामध्ये आहे, असा सचिन वाझे तसेच ज्याने तीन वर्षांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर मोटारीत बाँब ठेवले आणि नंतर गाडीच्या मालकाची हत्या केली अशा गुन्ह्याचा सूत्रधार असलेल्या परमवीर सिंग यांना फडणवीस यांनी आता पुढे केले आहे.’’

‘‘फडणवीस यांच्या सांगण्यावरून वाझे व परमवीर सिंग हे पोपटासारखे बोलत आहे. वरील दोन्ही प्रकरणाचा मूळ सूत्रधार परमवीर असल्यामुळे आम्ही त्याला तीन वर्षांपूर्वी निलंबित केले होते. त्याला केंद्रीय यंत्रणेकडून अटक होणार होती. पण तो भाजपला शरण गेला आणि आता आरोप करीत आहे,’’ असे देशमुख यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT