Sachin Waze sakal
महाराष्ट्र बातम्या

Sachin Waze : अनिल देशमुखांची ‘पीए’मार्फत वसुली ; सचिन वाझे याचा मुलाखतीत दावा, राजकीय वादाला नवी फोडणी

‘‘जे काही झाले, त्याचे पुरावे आहेत. माजी मंत्री अनिल देशमुख हे त्यांच्या स्वीय साहाय्यकामार्फत (पीए) पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे ‘सीबीआय’कडे असून आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘जे काही झाले, त्याचे पुरावे आहेत. माजी मंत्री अनिल देशमुख हे त्यांच्या स्वीय साहाय्यकामार्फत (पीए) पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे ‘सीबीआय’कडे असून आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे. मी पुरावे सादर केले आहेत. मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे. मी लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचेही नाव आहे,’’ पोलिसांच्या ताब्यात असलेला मुंबईचा वादग्रस्त निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरु असलेल्या वादाला नवीन फोडणी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी मात्र वाझेच्या या आरोपात कोणतेही तथ्य नसून फडणवीस यांचीच ही नवीन चाल आहे. वाझे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. तो विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले असल्याचे सांगत वाझेचे वक्तव्य फेटाळून लावले. अनिल देशमुख व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईचा निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्यावर ते पीएमार्फत पैसे घ्यायचे, असा आरोप केला आहे. ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत वाझे म्हणाला, ‘‘जे काही झाले, त्याचे पुरावे आहेत. मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायला तयार आहे.’’

सचिन वाझे याने मला पत्र पाठविल्याचे मी माध्यमातूनच ऐकले आहे. मी ते पत्र पाहिलेले नाही. कारण मी स्वतः दोन दिवसापासून नागपुरात आहे. जे काही समोर येईल त्याची खातरजमा केली जाईल, चौकशी केल्यानंतर प्रतिक्रिया देऊ. वाझेने पत्र पाठविले असेल तर त्याची निश्चित चौकशी करण्यात येईल.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील टोळीने महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा खाली आणून ठेवला आहे. तुमच्याकडे प्रवक्ते नाहीत म्हणून तुम्ही तुरुंगातील गुंडांना प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली. महाराष्ट्राची मान शरमेने खाली जात आहे.

- खा. संजय राऊत, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

सचिन वाझे मला कधीच भेटले नाहीत. आजकाल तुरुंगात असणाऱ्या माणसांच्या मुलाखती होत आहेत. ज्यांच्यावर दोन- दोन खुनाचे आरोप आहेत अशा व्यक्ती मुलाखती देत आहेत. तुरुंगातील गुन्हेगारांचा गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे दिसत आहे.

- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष

सचिन वाझेला अनिल देशमुख यांच्यावर आरोप करायला सांगण्यामागे कोणती शक्ती आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कोठडीतील आरोपीला माध्यमांशी बोलण्याची परवानगी नाही, मग वाझेलाच ती परवानगी कोणी दिली? याची चौकशी झाली पाहिजे तसेच वाझेच्या बंदोबस्तासाठी जे पोलीस होते त्यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे.

- अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ते, प्रदेश काँग्रेस कमिटी

सत्तेसाठी गलिच्छ राजकारण : खा.सुळे

‘‘ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप करण्यात आले, त्यातील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. असे असताना निवडणुकीच्या तोंडावर वाझे यांचे पत्र येणे आणि आरोप- प्रत्यारोप करणे हे सर्व भाजपचे सत्तेसाठीचे गलिच्छ राजकारण आहे,’’ अशी टीका खा.सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. त्या म्हणाल्या, ‘‘या पत्राची वेळ पाहिली तर लक्षात येईल की, विधासभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत. इतकी वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सत्ता आहे. मग या गोष्टी आताच कशा काय येतात? गेली अडीच वर्षे त्यांचे सरकार महाराष्ट्रात आहे. ज्यांच्यावर भाजपने आरोप केले, ते सर्व आता भाजपसोबत सत्तेत आहेत.’’

फडणवीस यांचीच ही नवी चालः देशमुख

वाझे याची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर अनिल देशमुख यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. देशमुख म्हणाले, ‘‘फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी मी प्रतिज्ञापत्र करून द्यावे यासाठी माझ्यासमोर प्रस्ताव आणला होता. ही गोष्ट ज्यावेळी मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणली. त्यानंतर आता फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. वाझेला आतापर्यंत दोन खुनांच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. आणखी एका हत्येच्या गुन्ह्यात तो तुरुंगात आहे. वाझे हा विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाझेला हाताशी धरून फडणवीस आरोप करायला लावत आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT