Sadabhau Khot & Aditya Thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर सदाभाऊंनी सोडला बाण; म्हणाले...

सरकारने जनतेच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करत असतात.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अयोध्या दौऱ्यावर गेले असून, त्यांच्या या दौऱ्यावर सदाभाऊ खोत (Sadabhaou Khot) यांनी बोचरी टीका केली आहे. खोत म्हणाले की, तुम्ही रामाकडे जावा नाही, तर काशीत अंघोळ करा, राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही संपला आहात असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेला लगावला आहे. (Sadabhaou Khot On Aditya Thackeray Ayodhya Tour)

सरकारने जनतेच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करत असतात. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आणि गोंधळ घातला ते आज अयोध्येच्या स्वारीवर गेले असल्याचेही खोत म्हणाले.

जे राम मंदिर बांधायची यांच्यात हिम्मत नाही असे म्हणाले तेच आता आयोध्येला निघाले आहेत. म्हणजे यांना रामाचाही जप करायचा आहे आणि काँग्रेस वगैरे आहेत त्यांना हिरवे झेंडे खांद्यावर घेऊन नाचायचे आहे.

एका म्यानात दोन तलवारी राहतील कशा? आता त्या राहू शकत नाहीत. मग तुम्ही रामाला जावा नाही तर, काशीला जाऊन आंघोळ करा. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून तुम्ही संपलेले आहात असे वक्तव्य खोत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ohh Shit...! अभिषेक आजारी, त्यात स्टार फलंदाज झाला जखमी; जसप्रीतच्या यॉर्करवर डावी टाच दुखावली, वेदनेने कळवळला...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं लेखी उत्तर; उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

Vande Bharat Cyclothon : वंदे मातरम' कोस्टल सायक्लोथॉन सायकल रॅलीतून सागरी सुरक्षेचा संदेश

T20 World Cup AUS vs IRE : संकटांवर मात करत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला; आयर्लंडने स्पर्धेतून जवळपास गाशा गुंडाळला

Latest Marathi News Live Update : बांधकाम नकाशा हीच अकृषिक परवानगी - जमीन महसूल कायद्यात सुधारणा

SCROLL FOR NEXT