Sharad Pawar News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: शरद पवार सैतान, पाप फेडावीचं लागतील; राज्यातील बड्या नेत्याची जीभ घसरली

Sharad Pawar politics: शरद पवारांवर विषयी बोलताना राज्यातील बड्या नेत्याची यांची टीका

सकाळ डिजिटल टीम

Sadabhau Khot on Sharad Pawar: राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसतायत. अशात राष्ट्रवादीतील फुटी नंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद रंगला आहे. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अनेक राजकीय नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. अशातच रयत क्रांती सेनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्याविषयी बोलताना जीभ घसरली. शरद पवारांवर त्यांनी जहरी टीका करत त्यांचा उल्लेख 'सैतान' असा केला.

माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, "महाराष्ट्रातील राजकारण प्रस्थापितांकडून विस्थापितांकडे चालल्याचं बघायला मिळतयं. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, वसंतदादा पाटील या माणसांच मोठं योगदान आहे."

यापुढे शरद पवारांविषयी बोलताना खोत म्हणाले की," ८०च्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार साहेबांचा उदय झाला आणि तिथून पुढे राजकारणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली आणि इतका ऱ्हास झाला की वाडे विरुद्ध गावगाडे आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा नवा संघर्ष उभा राहिला. सरंजामशाहीचा कालखंड पवारांमुळे उभा राहिलेला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि हा अंमल जवळजवळ ५० वर्ष या राज्यामध्ये राहिला."

खोत म्हणाले की," देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाला याचं मोठं श्रेय द्यावं लागेल. शरद पवारांनी सरदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रावर राज्य केलं, त्या सरदारांनी शेतकऱ्यांची घरे लुटली, गावगाडा उध्वस्त केला. ते सरदार आज सैरभैर पळायला लागले आणि पवार साहेबांवर काळानं मोठा सुड उगवला.

त्यामुळे शरद पवारांना त्यांना गावगाड्याकडे धावतं यावं लागत आहेत. जैसी करणी वैसी भरणी कलयुगामध्ये ज्याचं पाप त्यालाचं फेडाव लागतं आणि शरद पवारांना त्यांचं पाप खऱ्या अर्थांन फेडावं लागत आहे. हे आम्हा कार्यंकर्त्यांचं काम आहे की गावगाड्यामध्ये हा सैतान पुन्हा येता कामा नये."

सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांचा उल्लेख 'सैतान' असा केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

वैभव सूर्यवंशी अचानक पळत आला अन् गावसकर-बांगर यांच्यासमोर झाला नतमस्तक; SRH vs RR सामन्याआधीचा Video Viral

IND vs ENG: म्हणून हरमनप्रीत कौरसाठी आजची मॅच ठरणार 'अग्निपरीक्षा'; विश्वकरंडकापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान!

SCROLL FOR NEXT