Sadabhau Khot, Devendra Fadnavis Esakal
महाराष्ट्र बातम्या

फडणवीसांनी वडिलांना दिलेला शब्द पाळला ; सदाभाऊंनी सांगितली आठवण

....म्हणून गावागावात वनसमिती स्थापन झाली

सकाळ डिजिटल टीम

जमिनीचे तापमान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेण्याची भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी घेतली. त्यामुळेच गावागावात वनसमिती स्थापन झाली. बांध असेल तेथे झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला आणि जलयुक्त शिवार योजना आली असल्याचे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत (SadaBhau Khot) यांनी विधानसभेत सांगितले. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगत फडणवीसांचे कौतुक केले.

फडणवीसांनासोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करताना अधिक सखोलपणे, अभ्यासपूर्ण काम केले.

जलयुक्त शिवार योजने संदर्भात बोलताना सदाभाऊ म्हणाले, फडणवीसांनासोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करताना अधिक सखोलपणे, अभ्यासपूर्ण काम केले. यातून जमिनीच्या तापमान वाढीचा प्रश्न समोर आला. हे काम करत असताना वाढत्या तापमानाला रोखण्याचे प्लॅनिंग फडणवीसांनी केले. जमिनीचे तापमान कमी करायचे असेल तर पाण्याची पातळी वाढवावी लागेल असा निष्कर्ष समोर आला. यातून गावोगावी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

सदाभाऊ खोत यांनी विधानसभेत वडिल आणि फडणवीसांच्या भेटीचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, वडिलांना कॅन्सर उपचारासाठी लिलावत हाॅस्पिटलला अॅडमिट केले होते. आॅपरेशन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे भेटायला आले. त्यांनी वडिलांचा हातात हात घेऊन एक दिवस सदाभाऊला मंत्री करणार असल्याचे सांगितले. व त्याप्रमाणे फडणवीसांनी मंत्री केले. याचा सार्थ अभिमान असल्याचेही सदाभाऊंनी सांगितले.

सदाभाऊ खोत यांची फेसबुक पोस्ट

शब्दाला जागणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. माणसं अनेक पाहिली पण दिलेला शब्द जपणारे, शब्दाला जागणारा नेता म्हणजे आमचे देवेंद्रजी फडणवीस. फडणवीस साहेब यांनी मला आमदार व नंतर मंत्री करून हत्तीचे बळ दिले. शेतकरी-शेतमजूर बारा बलुतेदार यांच्या प्रश्नांवर लढण्याची ताकद दिली. अशा माणसावर मी माझा जीव ओवाळून टाकले तरी ते कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

Ashadhi Wari: पंढरपूरला चातुर्मासात रोज कीर्तनाची साडेतीनशे वर्षांची परंपरा

Flight Cancelled : तीन तासांची प्रतीक्षा अन् विमान रद्द

SCROLL FOR NEXT