sadabhau khot criticism on dilip walse patil  Esakal
महाराष्ट्र बातम्या

सदाभाऊंच्या निशाण्यावर गृहमंत्री; म्हणाले,बड्या नेत्यांच खातं...

विरोधी पक्षनेत्याला प्रिवेलेज असतं की नाही-सदाभाऊ खोत

सकाळ डिजिटल टीम

गृहमंत्री खात हे फक्त काही बड्या नेत्यांचे घरगुती खात झालं आहे हे महाराष्ट्राला माहीत झालं आहे. अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत पेन ड्राइव्ह सादर करत सरकारवर गंभीर आरोप केले. या आरोपाचे समर्थन सदाभाऊंनी केले आहे. त्यांनी ट्विट करत गृहमंत्री वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यावर निशाणा साधला.

भाजप आमदार गिरीश महाजन (girish mahajan) यांच्याविरोधात सरकारी वकीलच षडयंत्रं रचत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. या आरोपांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले आहे. फडणवीस यांनी सादर केलेल्या पेन ड्राइव्हमधील स्टिंग ऑपरेशनची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री वळसे पाटील यांनी केली आहे. तसेच, या प्रकणातील वकील प्रवीण चव्हाण यांचाही राजीनामा घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रकरणी गृहमंत्र्यावर टीका करताना सदाभाऊ म्हणाले, विरोधी पक्षनेत्याला प्रिवेलेज असतं की नाही, हे माहित नाही का असा सवाल त्यांनी विचारला. आघाडीवर टीका करताना ते म्हणाले, गृहमंत्री खात हे फक्त काही बड्या नेत्यांचे घरगुती खात झालं आहे हे महाराष्ट्राला माहीत झालं आहे असेही ते म्हणाले.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पावर टीका करत महाविकास आघाडीला धारेवर धरले. त्यांनी यापूर्वी एक पेन ड्राईव्ह सादर केला आहे. आज पुन्हा एक पेन ड्राईव्ह दिला. यावरून आता राजकीय वादळ उठण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT