महाराष्ट्र

'..म्हणे राज्यघटनेला धोका केंद्र सरकारकडून'

सकाळ डिजिटल टीम

...अन् राज्यघटनेला धोका केंद्र सरकार कडून; सदाभाऊ खोत यांचा टोला

सध्या देशातील उत्तर प्रदेश, मणिपूर आणि गोव्याच्या विधानसभा निवडणूकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक याच्यांत दररोज आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. देशात सध्या निवडणूकांचे वारे वाहत असून राजकीय नेतेमंडळींच्या भेठीगाठी वाढल्या आहेत. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, आप पक्षातील नेत्यांची एकमेकांवर टीका सुरु आहे. दरम्यान, आता या निवडणूकांचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनीही महाआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

यासंदर्भात ट्वीट करत त्यांनी अनेक गोष्टींना राज्यसरकार जबाबदार असून राज्यघटनेला धोका मात्र केंद्रसरकार कडून असल्याचा टोला लगावला आहे. याशिवाय त्यांनी आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीकाही केली आहे. ते म्हणतात, कोणत्याही घटनात्मक पदावर नसलेल्या सोनिया गांधी युपीएच्या काळात सरकारी फाईल्स बघायच्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मंत्र्यांच्या,अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. प्रियंका गांधींना पंजाबचे मुख्यमंत्री रिपोर्ट करतात, अन् राज्यघटनेला धोका केंद्र सरकार कडून कसा काय असू शकतो? असा सवाल करत त्यांनी खोचक टोलाही लगावला आहे.

दरम्यान, आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुजफ्फरनगरमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैच यांची भेट घेतली. यावेळी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या गंभीर समस्याविषयी बराच वेळ चर्चा केली. देशाचे राजकारण याविषयावरही चर्चा केली. दरम्यान, उत्तर प्रदेशाच्या पश्चिमेस सुरु असणाऱ्या काही ज्वलंत विषयांवर बातचीत झाली. यावेळी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना नेहमी अग्रही भूमिका घेत राहिल असेही राऊत यावेळी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT