महाराष्ट्र बातम्या

'असे साधुसंत येती घरा, तोची राष्ट्रवादीचा दिवाळी-दसरा'

राजकीय वर्तुळात विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राजकीय वर्तुळात विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मागील काही दिवसांपासून सातत्याने पत्रकार परिषद घेत आहेत. दरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा जयदीप राणासोबतच फोटो ट्वीट करत मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. यावरून राजकीय वर्तुळात विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनीही शरद पवार आणि फरार आरोपी विजय मल्ल्या यांचा फोटो ट्विट करत नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

ट्वीटमध्ये ते म्हणतात, नवाब मिया पवार साहेबांच्या बरोबर कोण हे साधुसंत ..? असे साधुसंत येती घरा तोची राष्ट्रवादीचा दिवाळी दसरा, असा चिमटा त्यांनी काढला आहे. पुढे एका ट्वीटमध्ये त्यांनी नवाब मलिक यांच्या आरोपावर प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना ड्रग माफियांची जवळीक करून संपत्ती गोळा करायची गरज नाही, कारण त्या माणसाने महाराष्ट्रातील लोकांच्या मनात घर केले आहे. त्यामुळे कोट्यवधी जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या आरोपानंतर फडणवीस उत्तर दिले आहे. ते म्हणाले, नवाब मलिक यांनी लवंगी फटाके लावून मोठा आवाज करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र नवाब मलिक यांनी जो फोटो ट्विट केला आहे त्यासंदर्भात कालच रिव्हरमार्चच्या टीमनं स्पष्टीकरण दिलं आहे. तो व्यक्ती त्या संघटनेने हायर केलेला होता. रिव्हरमार्च ही संघटना नदी पुनरुज्जीवन करण्याचं काम करते. त्यावेळी मी आणि अमृता फडणवीस यांनी त्या व्यक्तीसोबत फोटो काढला होता. मात्र, जाणीवपूर्वक नवाब मलिकांनी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT