politics esakal
महाराष्ट्र बातम्या

'राऊत साहेब, आपण आपली वसुली कमी करणार आहात का?'

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत होते. गेले काही दिवस इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक सतंप्त झाले आहेत. मात्र दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. केंद्राच्या या निर्णयाचे अनेक राज्यांनी स्वागत करत दर कमी केले आहेत. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. राज्यसरकारच्या या भूमिकेमुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका सुरु आहे. दरम्यान, शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ट्वीटद्वारे सडकून टीका केली आहे.

ते म्हणतात, खासदार राऊत साहेब, इंधन दरवाढीसंदर्भातील निर्णयात केंद्राने एक पाऊल पुढे टाकत पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत. आपण महाराष्ट्रातील जनतेच्या खिशातून प्रति लिटर 35 ते 40 रुपये काढत आहात. त्यातील आपण आपली वसुली कमी करणार आहेत का? ती जर तुम्ही कमी करू शकत नसाल, तर आम्हालाही नाईलाजाने म्हणावे लागेल की 'आपले मन हे किडके मन आहे', असा चिमटा त्यांनी काढला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली होती. यात ते म्हणाले होते, पेट्रोल ५० रुपयाने कमी करायचं असेल तर देशभरात भाजपाचा पराभव करावा लागेल. केंद्र सरकारचं मन हे मोठं नाही तर सडकं आहे, मन मोठं असतं, तर पेट्रोल २५ रुपयान कमी केलं असतं. त्यांच्या या टीकेली सदाभाऊ खोत यांनी प्रतित्त्युर दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रेकिंग : वैभव सूर्यवंशीसोबत धक्काबुक्की... खेळाडूंवर कारवाई, भारताच्या युवा फलंदाजाला कोणती शिक्षा मिळाली?

Comrades Marathon : पुण्याच्या धावपटूंचा दक्षिण अफ्रिकेत डंका! योगेश सानप यांचा ‘कॉम्रेड्स’ मॅरेथॉनमध्ये भारतीय राष्ट्रीय विक्रम

Pune Fraud News : गृहप्रकल्पाच्या नावाखाली ५० कोटींची फसवणूक! व्यापारी व निवासी सदनिका देण्याचे आमिष; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

Pune Fire : पत्रावळ्यांच्या कारखान्याला भीषण आग; शेजारील क्लिनिक, चार सदनिकांसह टाईल्सचे गोदाम खाक

Pune News : अर्थव्‍यवस्‍थेचा विकास हा आकड्यांचा खेळ; माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची टीका

SCROLL FOR NEXT