sadabhau khot  Esakal
महाराष्ट्र बातम्या

चोर शहाणे झाले, वसुलीच्या पैशावरच डल्ला; सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत यांचे सूचक ट्विट

सकाळ डिजिटल टीम

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्या खासगी सचिवाच्या गाडीतून रोख रकमेसह बॅग चोरीला गेली आहे. या घटनेने फलटणमध्ये खळबळ उडाली असतानाच रयत क्रांती संघटनेते नेते आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी नाव न घेता चोर पण शहाणे झाले आता वसुलीच्या पैशावरतीच डल्ला मारू लागले. असा शालजोडीतून लगावला.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे हे फलटण तालुक्यातील धुळदेव येथे दहा डिसेंबरला एका विवाह सोहळ्यासाठी गेले होते. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर शिंदे हे परत निघाले असता त्यांच्या गाडीची काच फोडल्याचे निदर्शनास आले .त्यांनी गाडीची तपासणी केली असता एक बॅग आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आहे. गृहमंत्र्यांच्याच खासगी सचिवाची बॅग चोरीस गेल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर सदाभाऊ खोत यांनी सूचक ट्विट केले आहे. ते म्हणतात चोर पण शहाणे झाले आता.. वसुलीच्या पैशावरतीच डल्ला मारू लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : घनसावंगी पंचायत समितीच्या कामांमध्ये दुमजली कामाचा स्लॅबचा कॉलम पडून मुजराचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT