Sadabhau Khot esakal
महाराष्ट्र बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांनी शांत राहावं; सदाभाऊ खोत यांचे आवाहन

न्याय मिळवण्याचा हा मार्ग योग्य नाही- सदाभाऊ खोत

सकाळ डिजिटल टीम

राज्यातल्या एसटी कामगारांना (ST Workers) मी विनंती करतो कामगारांनी शांततेने हा प्रश्न हाताळावा, न्याय मिळवण्याचा हा मार्ग योग्य नाही. हे आंदोलन भरकटलेले, दिशाहीन झालेले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व ज्यांनी केले त्यांनी कामगारांना चुकीचे मार्गदर्शन केले. त्यामुळे काल एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला केला. माझी कळकळीची विनंती आहे आता कर्मचाऱ्यांनी शांत राहाव असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

काल घडलेल्या या प्रकाराने राजकिय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नसून हा प्रकार लोकशाहीला कलंक लावणार आहे अशा प्रतिक्रिया नेत्यांनी दिल्या आहेत. दरम्यान आज आझाद मैदानावरून एसटी कर्मचाऱ्यांना बाहेर काढल्यानंतर मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्टेशन वर कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. आम्हाला महाराष्ट्र सरकारन वाऱ्यावर सोडलं असे म्हणत एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

आम्हाला महाराष्ट्र सरकारन वाऱ्यावर सोडलं असे म्हणत एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरून कर्मचाऱ्यांना रेल्वे पोलिसांनी बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्याकडे तिकीट नाही त्यांनी बाहेर पडा असे पोलीस कर्मचारी सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आझाद मैदानावरून एसटी कर्मचाऱ्यांना बाहेर काढल्यानंतर मुंबईच्या रेल्वे स्टेशन वर गर्दी करण्यात आली. मात्र रेल्वे स्टेशन वरून देखील रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

दुसरीकडे आज कोर्टामध्ये गुणरत्न सदावर्ते यांना हजर केले जाणार आहे. त्यामुळे सीएसएमटी स्टेशन वर तणावाचे वातावरण झाले आहे. मोठ्या संख्येने आंदोलनासाठी हे कर्मचारी जमा झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT