महाराष्ट्र बातम्या

Sahitya Sammelan 2023: मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावेळी गोंधळ, 'वेगळा विदर्भ'च्या जोरदार घोषणा

सकाळ डिजिटल टीम

वर्धा इथं आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज पहिला दिवस होता. मात्र हा पहिलाच दिवस विदर्भवाद्यांनी घातलेल्या गोंधळामुळे चर्चेत आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी हा गोंधळ झाला.

मराठी साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. या संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यानंतर त्यांचं भाषण सुरू असतानाच विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभामंडपात गोंधळ निर्माण झाला. या आंदोलकांची दखल मुख्यमंत्री शिंदेंनीही आपल्या भाषणात घेतली.

एकनाथ शिंदे म्हणाले, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहे. या मान्यवरांचे स्वागत आपण केले पाहिजे. सरकारची दारे २४ तास उघडी आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. आज हे साहित्यिकांचे राज्य आहे, कृपया तुम्ही गोंधळ घालू नये.

गोंधळ करणाऱ्या या आंदोलकांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली. विदर्भावर उर्जा, पाणी, निधी प्रत्येक गोष्टीत अन्याय होत आहे, असं आंदोलकांचं म्हणणं होतं. दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lawyer Rakesh Kishor assaulted in Court Video : माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वरिष्ठ वकिलास न्यायालयाच्या आवारातच चपलेने मारहाण!

इंग्लंडच्या कर्णधारावर IPL 2026 खेळण्यावर का घातलीय बंदी? जाणून घ्या नवीन नियम

Jay Anmol Ambani case : रिलायन्स ग्रुपमध्ये पुन्हा खळबळ! अनिल अंबानींच्या मुलावर CBIची कारवाई; ₹228 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप

हे सगळं थांबवा... स्वतःचा तो फोटो पाहून संतापली प्राजक्ता माळी; असं घडलं तरी काय? म्हणते- मी कधीच...

Latest Marathi News Live Update : मुंबई पोलिसांनी केली अंमली पदार्थांविरोधी मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT