Sahyadri forest area found two Tigers  
महाराष्ट्र बातम्या

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघ

सकाळवृत्तसेवा

पुणे : नुकत्याच झालेल्या कॅमेरा ट्रॅपमधील अभ्यासात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दोन पट्टेरी नर वाघाची छायचित्रे कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मे महिन्याच्या 23 व 24 तारखेला प्रकल्पातील दोन भागांमध्ये ही छायाचित्रे टिपण्यात आली. सह्याद्री प्रकल्प व भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून यांच्या अंतर्गत मागील एक वर्षापासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळे अभ्यास सुरू आहेत. त्या अभ्यासाचा एक भाग म्हणून टायगर रिकर्वी प्रोग्राम सुरू आहे. 

ग्रीड करून पायी किंवा कॅमेरा लावून अभ्यास केला जातो. म्हणेज, दोन-दोन किमीच्या अंतरावर दहा ते पंधरा दिवस कॅमेरा लावून ठेवला जातो. या काळात त्या परिसरात आलेल्या सर्व वन्यजीवांचे परिक्षण केले जाते. त्यांचा अभ्यास केला जातो. असाच अभ्यास सुरू असताना 23 व 24 मे या दोन दिवशी पट्टेरी वाघांची छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद झाली. ही अतिशय उल्साहदायक बाब आहे. 

मागील काही वर्षांमध्ये या प्रकल्पाचे चांगल्या प्रकारे संरक्षण केल्यामुळे इथे सांबर, बेखर, गवे आदी प्राण्यांची संख्या वाढली आहे. वाघाला जिवंत राहण्यासाठी याच प्राण्यांची गरज असते. त्यामुळेही दोन पट्टेरी वाघांचे वास्तव्य या भागात आढळून आले. ही दिलासादाय बाब आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोस्त दोस्त ना रहा! लग्न न करण्याचा सल्ला दिल्यानं हल्ला, ५२ वर्षीय मित्राला अटक

Dope Test : यशस्वी जैस्वाल, शफाली वर्मा यांना NADA ने पाठवली नोटीस

प्रत्येक पाचव्या मिनिटाला एकाचा मृत्यू, सर्वाधिक आत्महत्या, हत्या, अपघाती मृत्यू महाराष्ट्रात; धक्कादायक अहवाल समोर

Drishti satellite : भारताचा पहिला खासगी SAR उपग्रह दृष्टि! अंतराळात फिरतोय की कोसळला? GalaxEye संस्थापकांनी दिलं उत्तर

Mumbai: नामुष्कीनंतर महायुती सावध, ‘त्या’ प्रस्तावाला सभागृहाची अखेर मंजुरी

SCROLL FOR NEXT