Ashadhi Wari  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Wari : भक्तिरसात न्हाला वारकऱ्यांचा मेळा;नवीन पालखी तळावर संत तुकोबारायांचा सोहळा विसावला

ढगाळ वातावरणामुळे ऊन सावल्यांचा खेळ‌ सुरू होता. परिणामी, घामाच्या धारा आणि नभातील जलधारा अंगावर घेत भक्तिरसात नाहून निघालेला जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांचा सोहळा मंगळवारी (ता. २) लोणी काळभोरजवळील कदमवाकवस्ती या नवीन पालखी तळावर सायंकाळी सव्वासात वाजता समाजआरती नंतर मुक्कामी विसावला.

राजेंद्रकृष्ण कापसे

लोणी काळभोर : ढगाळ वातावरणामुळे ऊन सावल्यांचा खेळ‌ सुरू होता. परिणामी, घामाच्या धारा आणि नभातील जलधारा अंगावर घेत भक्तिरसात नाहून निघालेला जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांचा सोहळा मंगळवारी (ता. २) लोणी काळभोरजवळील कदमवाकवस्ती या नवीन पालखी तळावर सायंकाळी सव्वासात वाजता समाजआरती नंतर मुक्कामी विसावला.

देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानने सकाळी पादुकांची अभिषेक‌ काकड आरती झाली.‌ सकाळी पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरातून सकाळी सात वाजता पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. आज आषाढी एकादशी पूर्वीची योगिनी एकादशी.‌ वारकऱ्यांचा दीड दिवसांचा उपवास‌ असतो. संत तुकोबारायांचे दर्शनी भागावर चित्र रथावर भगव्या पताका, फुगे आणि फुलांची आरास यामुळे रथ आकर्षक दिसत होता.‌ झेंडू, गुलछडी, शेवंती, गुलाब यांसह जरबेरा, ऑर्किड अशा विविध रंगी फुलांची आरास केली होती.

पुणेकरांचा दोन दिवसांचा निरोप घेत पालखी पुणे शहरातून बाहेर पडत होती. ढगाळ वातावरण होते. परिणामी ऊन आणि सावली असा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. उकाडा जाणवत होता. घामाच्या धारांनी वारकरी चिंब भिजले होते. पुलगेट, भैरोबानाला, फातिमानगर, रामटेकडी, मगरपट्टा चौक मार्गे हडपसर येथे पालखीने विसावा घेतला.

एकादशीमुळे फराळाचे पदार्थ खाताना विठोबाचा जप सुरू होता. दीड वाजता अचानक अर्धा तास वरुणराजा बरसला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाडा कमी झाला. येथून दोन वाजता सोहळा मार्गस्थ झाला. त्यानंतर मांजरी फार्म येथे चार वाजता कदमवाकवस्तीकडे निघाला. राज्य सरकारच्या माध्यमातून लोणी काळभोरच्या जवळील कदमवाकवस्ती येथे नवीन पालखीचे उभारला आहे. यामुळे ''साधुसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा'' अशी भावना कदमवाकवस्ती येथील नागरिकांची झाली होती. येथे रात्री केसापुरकर दिंडीच्या वतीने कीर्तन, तर तेरकर दिंडीच्या वतीने जागर करण्यात आला.

कदमवाकवस्ती येथे शासनाने साडेसात एकरात पालखीतळ उभारला आहे. महिन्यापूर्वी पालखी पाहणी केली. त्यावेळी येथील सोयीसुविधांबाबत जिल्हा प्रशासनाला या संदर्भात सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार पालखी सोहळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

- संजय महाराज मोरे, विश्वस्त, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 5th T20I: लखनौचा सामना 'धुक्यात' हरवला; आता भारत-दक्षिण आफ्रिका पाचवा सामना कधी व कुठे होणार, ते पाहा...

Nagpur News: डागा रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ, वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

Viral Video: 'अरे पैसा नही चाहिये', रेल्वे स्टेनशवरील बाप-लेकीची गोड व्हिडिओ व्हायरल

पिंजऱ्यात शिकार, जंगलात राज! वाघीण 'तारा'ची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दणक्यात एन्ट्री, शास्त्रीय पद्धतीने कशी राबवली 'सॉफ्ट रिलीज'?

Atal Bihari Vajpayee : राष्ट्रपतिपद स्वीकारण्यास वाजपेयींचा होता नकार; तत्कालीन माध्यम सल्लागार अशोक टंडन यांच्या पुस्तकात दावा

SCROLL FOR NEXT