Sakal Premier Award  sakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Premier Award : कौतुकाची थाप अन् कलाविष्कारांचा रंगणार सोहळा;‘सकाळ प्रीमियर अवॉर्ड’चे आज ‘सन मराठी’ वाहिनीवर प्रसारण

मनोरंजनसृष्टीतील कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतानाच एकापेक्षा एक सरस कलाकारांचे नृत्याविष्कार, रॅपर सौरभ गाडगीळचे मराठी रॅप आणि पहिला इंडियन आयडॉल अभिजित सावंतच्या सुरेल मैफलीचा आनंद आज, रविवारी (ता. २१) अनुभवता येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मनोरंजनसृष्टीतील कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतानाच एकापेक्षा एक सरस कलाकारांचे नृत्याविष्कार, रॅपर सौरभ गाडगीळचे मराठी रॅप आणि पहिला इंडियन आयडॉल अभिजित सावंतच्या सुरेल मैफलीचा आनंद आज, रविवारी (ता. २१) अनुभवता येणार आहे. निमित्त आहे ‘सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कार सोहळ्या’चे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्याचे सन मराठी वाहिनीवर रात्री आठ वाजता प्रसारण होणार आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी आणि माधुरी पवार यांचा दिलखेचक नृत्याविष्कार, शिव ठाकरेचा दमदार परफाॅर्मन्स, रॅपर सौरभ अभ्यंकरचे मराठी रॅप आणि ‘इंडियन आयडॉल’फेम गायक अभिजित सावंतची सुरेल गीतांच्या मैफलीचा आनंद घेता येणार आहे.

मनोरंजनसृष्टीतील कलाकारांच्या कलागुणांचा गौरव करणारा ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा’ ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मोठ्या थाटामाटात पार पडला. पीएनजी ज्वेलर्स लि. या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत.

नवोदित कलाकार भाग्यम जैन, अस्मिता देशमुख व संचित चौधरी यांनीही सोहळ्यात आपल्या परफॉर्मन्सने उपस्थितांची वाहवा मिळविली. अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि सारंग साठ्ये यांच्या खुमासदार आणि तितक्याच नेटक्या सूत्रसंचालनाने सोहळ्याला खऱ्या अर्थाने रंगत आणली.

कान्स चित्रपट महोत्सवात भारतीयांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांचाही विशेष गौरव सोहळ्यात करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक महेश कोठारे यांना चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ग्लॅमरस अभिनेत्री वर्षा उसगावकरलाही चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT