Sakal Drawing Competition 2024
Sakal Drawing Competition 2024 sakal
महाराष्ट्र

Sakal Drawing Competition 2024 : ‘सकाळ चित्रकला’ स्पर्धेच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी १९८५पासून आयोजित केली जाणारी राज्यव्यापी ‘सकाळ-चित्रकला’ स्पर्धा यंदा २१ जानेवारी (रविवारी) होणार आहे. एकाच दिवशी, एकाच वेळी महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांत आयोजित होणारी सर्वांत मोठी स्पर्धा म्हणून ‘सकाळ-चित्रकला’ स्पर्धेची ख्याती आहे. गेली ३८ वर्षे सातत्याने ही स्पर्धा होत असून, यंदा स्पर्धेचे हे ३९ वे वर्ष आहे. कोरोना काळातसुद्धा ही स्पर्धा ऑनलाइन झाली होती.

आतापर्यंत कोट्यवधी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असून, २०१८मध्ये झालेल्या स्पर्धेतील लक्षणीय सहभागाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’ या जागतिक स्तरावरील प्रमाणित संस्थांनी घेतली आहे. मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, यासाठी स्पर्धेची सुरुवात झाली. दरवर्षी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत जाणारा आहे.

स्पर्धेचे स्वरूप

‘सकाळ चित्रकला’ स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी, तसेच पालकांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी खुली असेल. स्पर्धेसाठी प्रतिस्पर्धक ५० रुपये नाममात्र प्रवेश शुल्क आहे. ही स्पर्धा एकूण सहा गटांत होणार असून, शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा (इयत्ता पहिली ते दहावी) निवडलेल्या स्पर्धा केंद्रांवर प्रत्यक्ष (ऑफलाइन) होणार असून, फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात असेल.

‘सकाळ चित्रकला’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाचे बंधन नाही, कोणत्याही गटासाठी रंगसाहित्याच्या विशिष्ट माध्यमांचे बंधन नाही. चित्र कोणत्याही रंग साहित्याने रंगवू शकता. याशिवाय स्पर्धेत प्रत्यक्ष (ऑफलाइन) सहभागी होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे दिला जाईल. स्पर्धेचे नियम, ऑफलाइन स्पर्धा केंद्रांचे तपशील, महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीच्या ऑनलाइन स्पर्धेबाबतची माहिती दैनिक ‘सकाळ’मधून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.

स्पर्धेच्या ऑनलाइन नोंदणीला विद्यार्थी, पालक व ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वैयक्तिक नोंदणीबरोबरच ग्रुप बुकिंगचीही सुविधा नोंदणीच्या वेबसाइटवर नुकतीच सुरू झाली आहे. मात्र, ग्रुप बुकिंग करताना सर्व सहभागी विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरणे आवश्यक आहे. संपूर्ण राज्यातील स्पर्धेच्या केंद्रांची नावेही नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. ऑनलाइन नोंदणी करताना स्पर्धकांनी जवळच्या केंद्राचे नाव निवडणे आवश्यक आहे, याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.

असे व्हा स्पर्धेत सहभागी

‘सकाळ चित्रकला’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व स्पर्धेच्या नोंदणीसाठी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून किंवा खाली दिलेली लिंक ओपन करून स्पर्धेसाठी नोंदणी करावी. स्पर्धेसाठी नोंदणी व प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था ही फक्त ऑनलाइन असणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व व ऑनलाइन नोंदणीसाठी chitrakala.sakalnie.in व ऑनलाइन नोंदणीसाठी www.ticketkhidakee.com या वेबसाइटला भेट द्यावी किंवा ९८८१५९८८१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

विशेष मुलांनाही सहभागी होता येणार

राज्याच्या प्रमुख शहरातील आश्रम शाळांमधील विद्यार्थी, आदिवासी एकात्मिक प्रकल्प संचालित आश्रम शाळा, स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित वसतिगृहांमधील विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग शाळांमधील विद्यार्थीही स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रमुख शहरांतील आश्रम शाळा व विशेष आणि दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्पर्धेसाठी ९८८१५९८८१५ या क्रमांकावर व rahul.garad@esakal.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.

स्पर्धेचे गट व वेळ (ऑफलाइन स्पर्धा )

‘अ’ गट : पहिली व दुसरी

‘ब’ गट,: तिसरी व चौथी

वेळ : सकाळी ११ ते १२.३०

‘क’ गट : पाचवी ते सातवी

‘ड’ गट :आठवी ते दहावी

वेळ : सकाळी ९ ते १०

ऑनलाइन स्पर्धा

‘इ’ गट - सर्व प्रकारच्या विद्याशाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थी

‘फ’ गट - पालक व ज्येष्ठ नागरिक

वेळ - स्पर्धेच्या दिवशी

स. ९ ते सायं. ७ या वेळेत चित्र अपलोड करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT