Sakal Drawing Competition Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Drawing Competition : ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ २२ जानेवारीला

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी १९८५ पासून आयोजित केली जाणारी राज्यव्यापी ‘सकाळ - चित्रकला स्पर्धा - २०२३’ यंदा रविवार (ता. २२ जानेवारी) या दिवशी आयोजित केली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी १९८५ पासून आयोजित केली जाणारी राज्यव्यापी ‘सकाळ - चित्रकला स्पर्धा - २०२३’ यंदा रविवार (ता. २२ जानेवारी) या दिवशी आयोजित केली जाणार आहे.

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी १९८५पासून आयोजित केली जाणारी राज्यव्यापी ‘सकाळ - चित्रकला स्पर्धा - २०२३’ यंदा रविवार (ता. २२ जानेवारी) या दिवशी आयोजित केली जाणार आहे. एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण राज्यात आयोजित केली जाणारी स्पर्धा म्हणून ‘सकाळ - चित्रकला स्पर्धे’ची सर्वत्र ख्याती आहे. गेली ३७ वर्षे सातत्याने ही स्पर्धा होत असून यंदा स्पर्धेचे हे ३८वे वर्ष आहे. कोरोनाकाळातसुद्धा ऑनलाइन स्वरूपात ही स्पर्धा घेण्यात आली होती.

आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असून, २०१८ साली आयोजित केलेल्या स्पर्धेतील लक्षणीय सहभागाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या जागतिक स्तरावरील प्रमाणित संस्थांनी घेतली आहे. मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, यासाठी स्पर्धेची सुरवात झाली. दरवर्षी लाखो शालेय विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

स्पर्धेत सहभागासाठी वयाचे बंधन नाही. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व विविध विद्या शाखांच्या महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी, तसेच पालकांसाठी व आजी आजोबांसाठी खुली असेल. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. ही स्पर्धा एकूण चार गटांत घेण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा निवडलेल्या स्पर्धा केंद्रावर प्रत्यक्ष होणार असून, फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची व पालक आणि आजी-आजोबांसाठी ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात असेल.

स्पर्धेत प्रत्यक्ष (ऑफलाइन) सहभागी होणाऱ्या विद्यार्थी व पालकांना, चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे विनामूल्य दिला जाईल. स्पर्धेचे नियम व स्पर्धा केंद्रांचा तपशील व महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व आजी-आजोबा यांच्यासाठीच्या ऑनलाइन स्पर्धेचे स्वरूप दैनिक ‘सकाळ’मधून लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९८८१५९८८१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

गरजू विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी

राज्यभरातील प्रमुख शहरातील आश्रम शाळांमधील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित वसतिगृहांमधील विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थीसुद्धा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रमुख शहरांतील आश्रम शाळा व विशेष आणि दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्पर्धेसाठी खालील व्हाट्सॲप क्रमांकावर विद्यार्थ्यांची नोंदणी करावी. ८६०५०१७३६६/९९२२४१९१५०

पालकांना व आजी-आजोबांना सुवर्णसंधी

‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेचे हे ३८वे वर्ष असून, तीन पिढ्यांना जोडलेली ही एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेत १९८५पासून भाग घेतलेल्या, मात्र आता पालक किंवा आजी-आजोबा झालेल्यांसाठीही यंदाची ‘सकाळ -चित्रकला स्पर्धा २०२३’ सुवर्णसंधी आहे. या स्पर्धेत पालक व आजी-आजोबा देखील सहभागी होऊ शकतात.

स्पर्धेसाठीचे गट

  • अ - गट (पहिली ते दुसरी),

  • ब - गट (तिसरी ते चौथी),

  • क - गट (पाचवी ते सातवी)

  • ड - गट (आठवी ते बारावी व बारावीनंतरचे सर्व व पालक, आजी - आजोबा)

  • वेळ - ‘अ’ व ‘ब’ गटांसाठी सकाळी ११.०० ते दुपारी १२.३०

  • ‘क’ व ‘ड’ गटांसाठी सकाळी ९ ते १०.००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; पहाटे 3 वाजता Porsche ची धडक

Marathi News Live Updates : झारखंडमध्ये JPSC-JSSC विद्यार्थ्यांच्या 'विधानसभा घेराव' मोर्चात पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलक विद्यार्थी आक्रमक

Blocked Nose: सर्दी नाही तरी रात्रीच्या वेळी नाक का बंद होते? जाणून घ्या कारण आणि सोपे उपाय!

Mumbai Train Disturb: मुलुंड स्टेशनमध्ये ट्रेनवर काहीतरी पडले; आग लागली.. धुरांचे लोट अन् मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत Video

Bhudargad Fort Wall Collapse : अवघ्या 2 वर्षांत ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याची 50 फूट लांबीची तटबंदी कोसळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात, गडप्रेमींचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT