महाराष्ट्र बातम्या

सर्व अधिकार RBI कडे गेल्यास संचालकांनी काय करायचं - शरद पवार

सकाळ डिजिटल टीम

सहकार क्षेत्रात काही लोक सत्तेचा गैरवापर करतात ही लोकांमध्ये समज आहे असेही शरद पवार यांनी म्हटलं.

महाराष्ट्र, गुजरात या राज्यात सहकाराचं मोठं काम. सहकार संस्था उभारण्यासाठी अंनेकांनी आपली हयात घालवली मात्र सहकार क्षेत्रात सध्या खूप अस्वस्थता वाढली आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी प्रस्तुत सकाळ महा कॉन्क्लेव्ह नागरी व जिल्हा सहकारी पतसंस्थांच्या 3 दिवसीय महापरिषदेत ते बोलत होते.

सहकार क्षेत्रातील लोकांच्या शिक्षणाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, पहिला साखर कारखाना काढणाऱ्या विखे पाटलांचं शिक्षण जास्ती नव्हतं, ज्यांनी महाराष्ट्रात सहकार चळवळ उभी केली असे वसंतदादा पाटील त्यांचं शिक्षणही कमीच आहे. तरीही सहकार चळवळ उभी राहिलीच. त्यामुळं शिक्षण ही अट नसली तरी सहकार उभं राहू शकतं.

अनुभवी लोकांना संस्थेतून बाहेर काढणं हे दुर्दैव,अनुभवी सहकार चळवळ संपवणे हे संस्थेसाठी धोकादायक, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन त्यांनी केलं. तसंच संस्थांना बलवान करण्यासाठी मोठ्या सुधारणा करण्याची काळाची गरज असल्याचं ते म्हणाले.

रिझर्व बँकेने काही सूचना केल्या आहेत. संचालक मंडळाचे दोन भाग होतील. सर्व अधिकार रिझर्व बँकेला गेले तर संचालक मंडळाने काय करायचं असा सवालही शरद पवार यांनी विचारला. सहकार क्षेत्रात काही लोक सत्तेचा गैरवापर करतात ही लोकांमध्ये समज आहे. सहकार क्षेत्रातील लोकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणली जात असल्याची शोकांतिका शरद पवार यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT