Sakal-Newspaper 
महाराष्ट्र बातम्या

एक एप्रिलपासून ‘सकाळ’ पुन्हा सेवेत

सकाळवृत्तसेवा

पुणे - केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउन आणि संचारबंदीतून प्रसार माध्यमांना वगळण्यात आले आहे. शिवाय वृत्तपत्रांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होत नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी (ता. २८) वृत्तपत्र प्रतिनिधींच्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे मागील चार दिवसांपासून बंद असलेला सकाळ येत्या एक एप्रिलपासून  सुरू करण्याचा निर्णय सकाळ प्रशासनाने घेतला आहे. यामुळे आठवडाभराच्या खंडानंतर ‘सकाळ’ पुन्हा पुणेकरांना उपलब्ध होणार आहे.

शहरातील प्रमुख वृत्तपत्र प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी राम यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत संचारबंदी कालावधीत वृत्तपत्र वितरणाबाबत येत असलेल्या  अडचणी सोडवण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी हे स्पष्ट केले.

वृत्तपत्र वितरणाशी संबंधित मनुष्यबळाला संरक्षण मिळावे, यासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येईल, असे आश्वासनही राम यांनी  वृत्तपत्र प्रतिनिधींना यावेळी दिले. शिवाय वृत्तपत्रामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होत नाही. त्यामुळे नागरिकांनी नाहक भीती बाळगू नये आणि नियमितपणे वृत्तपत्रे वाचावीत असे आवाहनही जिल्हाधिकारी राम यांनी पुणेकरांना केले आहे.             

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी राज्य सरकारने २३ मार्चपासून  राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे २४ मार्चपर्यंत सकाळ नियमितपणे प्रकाशित होत असे. परंतु, २५ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत मुद्रित स्वरूपातील ‘सकाळ’चे  प्रकाशन बंद करण्यात आले होते. सध्या ‘सकाळ’ ऑनलाइन स्वरूपात प्रकाशित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT