Sakal Premier Awards 2024 sakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Premier Awards 2024 : ‘सकाळ प्रीमियर’ पुरस्कार सोहळ्याचे रविवारी प्रसारण;‘सन मराठी’ वाहिनीवर पाहता येणार रंगारंग सोहळा

‘सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कार सोहळ्या’चे हे चौथे वर्ष आहे. या वर्षी हा सोहळा ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडला. या सोहळ्यात मनोरंजनसृष्टीतील कलाकार, निर्माते-दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदी मंडळींसह सामाजिक, राजकीय व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एकापेक्षा एक सरस कलाकारांचा बहारदार नृत्याविष्कार, मराठमोळा रॅपर सौरभ अभ्यंकरचे मराठी रॅप आणि पहिला ‘इंडियन आयडॉल’ अभिजित सावंतच्या सुरेल गाण्यांच्या मैफलीसोबतच पुरस्कार स्वीकारल्यानंतर विजेत्यांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहणारा आनंद, अशा रोमहर्षक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा’ येत्या रविवारी, २१ जुलै रोजी ‘सन मराठी’ वाहिनीवर रात्री आठ वाजता प्रसारित केला जाणार आहे. पीएनजी ज्वेलर्स लि. या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत.

‘सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कार सोहळ्या’चे हे चौथे वर्ष आहे. या वर्षी हा सोहळा ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडला. या सोहळ्यात मनोरंजनसृष्टीतील कलाकार, निर्माते-दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदी मंडळींसह सामाजिक, राजकीय व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मनोरंजन क्षेत्रातील अनेक तेजस्वी हिऱ्यांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, माधुरी पवार, भाग्यम जैन, अस्मिता देशमुख, शिव ठाकरे आणि संचित चौधरी यांनी वेगवेगळे नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांचे वन्स मोअर मिळविले. पहिला ‘इंडियन आयडॉल’ ठरलेल्या अभिजित सावंतने आपल्या सुरांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. आताच्या पिढीचा व नव्या दमाचा रॅपर सौरभ अभ्यंकरने मराठमोळा रॅप सादर करून सगळ्यांची वाहवा मिळविली. अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि सारंग साठ्ये यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने सोहळ्याला वेगळीच रंगत आणली.

ज्येष्ठ अभिनेते, तसेच निर्माते व दिग्दर्शक महेश कोठारे यांना मराठी चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ग्लॅमरस अभिनेत्री वर्षा उसगावकरलाही मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. कान्स चित्रपट महोत्सवात तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या छाया कदम यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

विजेत्यांवर कौतुकाची थाप

हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्तम कामगिरीबद्दल अभिनेत्री अदा शर्मा हिला ‘सकाळ प्रीमियर परफॉर्मर ऑफ द इयर’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘सकाळ प्रीमियर पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ पुरस्काराने राशी खन्ना हिला गौरवण्यात आले. अभिनेत्री दिशा परदेशी ‘प्लॅनेट मराठी फेस आॅफ द इयर’ ठरली. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटासाठी अंकुश चौधरी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला.सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मधुरा वेलणकर हिला ‘बटरफ्लाय’ चित्रपटासाठी देण्यात आला. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या पुरस्कारावर ‘आत्मपॅम्फ्लेट’ने मोहर उमटवली. चमचमत्या तारे-तारकांचा हा झगमगाटी सोहळा आता ‘सन मराठी’वर पाहता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : नागपूरमध्ये कोराडी मंदिराचं निर्माणाधीन लोखंडी गेट कोसळलं, १५ मजूर जखमी, स्लॅब टाकण्याचे सुरू होते काम

Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश, कारण काय?

Chandrashekhar Bawankule : महसूल–पोलीस संगनमत उघड! वाळू माफियांना मिळते सरकारी पाठबळ? मंत्र्यांच्या थेट कबुलीनं चर्चांना उधाण...

Donald Trump : टॅक्समध्ये सूट मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या पत्नीच्या मृतदेहाचा केला वापर? नियमाचा घेतला गैरफायदा, वाचा काय आहे प्रकरण?

Thane Politics: ठाण्यात राज ठाकरे आणि शरद पवारांना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या शिंदेसेनेचं बळ वाढलं

SCROLL FOR NEXT