Sakal Premier sakal
महाराष्ट्र बातम्या

Film Festival : सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कार सोहळा रंगणार २०२४ मध्ये

मनोरंजन क्षेत्रातील मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा, तसेच कलाकार आणि तंत्रज्ञांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा ‘सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कार सोहळा’ आता नवीन वर्षात अर्थात २०२४ मध्ये होणार.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मनोरंजन क्षेत्रातील मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा, तसेच कलाकार आणि तंत्रज्ञांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा ‘सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कार सोहळा’ आता नवीन वर्षात अर्थात २०२४ मध्ये होणार आहे.

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारेकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यामध्ये मनोरंजनाची उत्तम मेजवानी असणार आहेच; शिवाय चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणारे कलाकार आणि तंत्रज्ञांचा गौरव करण्यात येणार आहे. त्याबाबतची तारीख, ठिकाण व वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल.

पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लि. या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत. या सोहळ्याचे हे चौथे वर्ष आहे. पहिला सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात २०१७ मध्ये पार पडला होता. त्यानंतर दुसरा सोहळा पुण्यातील ॲमनोरा-हडपसर येथे २०१९ मध्ये पार पडला आणि तिसरा सोहळा ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला होता. या वेळी हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार व तंत्रज्ञ मंडळींबरोबरच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रथितयश आणि उदयोन्मुख कलाकारांचे विविध नृत्याविष्कार, विनोदाची उत्तम व खुसखुशीत मेजवानी आणि खुमासदार सूत्रसंचालन अशा उत्साहवर्धक वातावरणात हा सोहळा पार पडला होता. आताही हा सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडणार आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री अशा विविध विभागांतील पुरस्कार या सोहळ्यात दिले जाणार आहेत.

मनोरंजन क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्यांचा हा गौरव सोहळा आहे. आतापर्यंत या सोहळ्यामध्ये मराठीतील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांनी उपस्थिती लावली आहे. त्याचबरोबर हिंदीतील कलाकारांनीही या सोहळ्याचे कौतुक केले आहे. पुढील वर्षीही हा सोहळा अशाच रंगतदार वातावरणात पार पडणार आहे.

या सोहळ्याला हिंदीतील कलाकारांबरोबरच मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थिती राहणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT