Sakal Quiz  sakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Quiz : ओळखा विजेते, जिंका बाईक! ; वाचकांचा प्रतिसाद, अर्ज भरण्यासाठी शेवटचे चार दिवस

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बाजी महायुतीची की महाविकास आघाडीची? ‘फिर एक बार’ की काही नवीन घडणार? कुणाला किती जागा मिळतील? या गोष्टींचा अंदाज लावा आणि जिंका सुझुकी मोटारबाइक! ‘सकाळ’ तर्फे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर आधारित ‘अंदाज अपना अपना’ ही स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेला आता नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बाजी महायुतीची की महाविकास आघाडीची? ‘फिर एक बार’ की काही नवीन घडणार? कुणाला किती जागा मिळतील? या गोष्टींचा अंदाज लावा आणि जिंका सुझुकी मोटारबाइक! ‘सकाळ’ तर्फे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर आधारित ‘अंदाज अपना अपना’ ही स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेला आता नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला काही सोप्या प्रश्नांची उत्तरे पर्याय स्वरूपात निवडायची आहेत. तुमचे उत्तर अचूक ठरले अथवा निवडणुकांच्या निकालाच्या जवळ जाणारे ठरले तरीही तुमच्यासाठी स्पर्धा जिंकण्याची संधी असू शकेल. यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेला ‘क्यू आर’ कोड स्कॅन करत लिंकवर जात एक गुगल फॉर्म भरून द्यायचा आहे.

तो फॉर्म व्यवस्थित सबमिट केल्यानंतर निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच या स्पर्धेचे निकालदेखील जाहीर केले जाणार आहेत. जे अचूक अंदाज वर्तवतील अशा पाच भाग्यवान विजेत्यांना प्रत्येकी एक सुझुकी कंपनीची मोटारसायकल (Bike Model: Gixxer SF) मिळेल. या स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला स्पर्धेच्या नियम व अटी लागू असतील. ही स्पर्धा मर्यादित कालावधीसाठी असून नि:शुल्क आहे. त्यामुळे लवकरात लवकर स्पर्धेत सहभागी व्हा आणि तुमचे ज्ञान तर तपासून पाहाच पण बक्षिसे देखील जिंका.

काय आहेत नियम व अटी

  • लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच या स्पर्धेचा निकालसुद्धा ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल.

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३ जून २०२४

  • विजेत्यास भेटवस्तू मिळण्याआधी ओळख पटवण्यासाठी आपले आधारकार्ड आणि अन्य आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

  • अचूक उत्तरे देणाऱ्या वाचकांमधून लकी ड्रॉ मार्फत विजेते जाहीर केले जातील.

  • स्पर्धेसंबंधी सर्व हक्क सकाळ व्यवस्थापनाकडे आरक्षित आहेत.

  • विजेत्यांना गिफ्ट टॅक्स लागू होईल.

तुम्हाला काय करायचे आहे?

तुम्हाला फक्त सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे. त्यानंतर खुला होणारा अर्ज भरून द्यायचा आहे. तुमच्या अंदाजानुसार योग्य पर्यायाची निवड करत हा अर्ज व्यवस्थितरित्या ‘सबमिट’ करायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT