BJP-Congress-NCP-Sena
BJP-Congress-NCP-Sena e sakal
महाराष्ट्र

Sakal Survey : निवडणुका झाल्यास सर्वात मोठा पक्ष कोणता?

भाग्यश्री राऊत

मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) आहे. या सरकारला येत्या २८ नोव्हेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. भाजपकडून (BJP) सरकार पडेल असा दावा वारंवार केला जातो, तर महाविकास आघाडीचे नेते सरकार पाच वर्ष चालेल, असं ठणकावून सांगतात. ठाकरे सरकारच्या द्विवर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ''सकाळ आणि साम''ने मिळून एक सर्व्हे (Sakal Saam Survey) केला. त्यामधून आलेले निकाल हे धक्कादायक आहेत.

विरोधकांनी केलेला दावा खरा ठरला आणि राज्यात निवडणुका लागल्या तर नेमकं काय होईल? कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यानुसार राज्यभरात राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातून सॅम्पल सर्व्हे करण्यात आला. याशिवाय २८८ मतदारसंघात गट चर्चाही घेण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व्हेसाठी २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलेल्या मतदारांची निवड करण्यात आली. हे सॅम्पल निवडताना शहर, ग्रामीण आणि निमशहरी असा समतोल राखला असून महापालिका हद्दीतूनही सॅम्पल निवडण्यात आले. तसेच शिक्षण, आर्थिक, सामाजिक, लिंग, वय हे सर्व निकष लक्षात घेऊन हा सर्व्हे करण्यात आला.

कोणाला मिळणार जनाधार? -

सकाळ आणि सामने केलेल्या सर्वेहमध्ये ''राज्यात आज निवडणुका झाल्यास तुम्ही कोणाला मत द्याल?'' असा प्रश्न मतदारांना विचारण्यात आला. त्यावेळी सर्व पक्ष स्वतंत्र्य लढल्यास भाजपला सर्वाधिक म्हणजे २७.९ टक्के जनाधार असेल, तर त्यापाठोपाठ शिवसेनेला २४ टक्के जनाधार, त्यानंतर राष्ट्रवादी आणि सर्वात शेवटचा कौल हा काँग्रेसला दिसतोय. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपला २५.७५, शिवसेनेला १६.४१, राष्ट्रवादीला १६.७१ आणि काँग्रेसला १५.८७ टक्के मतदान झाले होते. जवळपास तोच क्रम या सर्वेक्षणामध्येही कायम आहे.

कोणता पक्ष ठरणार मोठा? -

पक्ष म्हणून सर्व स्वतंत्र्य लढल्यास २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसारखी परिस्थिती असेल. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार असून त्यांना १०४ जागा मिळणार असल्याचं दिसतंय. काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला अल्प लाभ होणार असून काँग्रेसला ४०, तर राष्ट्रवादीला ५९ जागा मिळतील, असं चित्र आहे. शिवसेना मोठी मुसंडी मारत ७७ जागांवर करणार असे या सर्वेक्षणातून दिसतंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Modi Road Show: PM मोदींचा उद्या घाटकोपरमध्ये 'रोड शो'; वाहतुकीत 'असे' असतील बदल

Madhavi Latha: "गुन्हे मेडल्ससारखे," बुरखा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माधवी लता आणखी काय काय म्हणाल्या

Artificial intelligence: आपल्याकडे खूपच कमी वेळ उरलाय... एआयवर IMF प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी

IPL 2024: क्वालिफायर अन् फायनल स्टेडियममध्ये जाऊन पाहायचेत? कसे आणि कधी करणार तिकीट बूक, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT