Sakal Saam Survey
Sakal Saam Survey Sakal
महाराष्ट्र

Sakal Saam Survey: मोदींचा ९ वर्षांतील धडाकेबाज निर्णय कोणता? राम मंदिर की ३७० कलम? नागरिकांना वाटतं...

राहुल शेळके

Sakal Survey: भाजप सरकारला सत्तेत ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सकाळने मतदारांचा कल समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातील 288 विधानसभा आणि 48 लोकसभेच्या मतदार संघात महासर्वेक्षण केले. (Sakal Saam Survey)

या सर्वेत सकाळच्या दोन हजारांवर सहकाऱ्यांनी सर्वेक्षण केले. यामध्ये ४९,२३१ लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून हे सर्वेक्षण केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची ही दुसरी टर्म आहे. सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची चार वर्षे पूर्ण झाली आहेत. यासह भाजप सरकारला सत्तेत ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या वर्षांत सरकारने असे अनेक मोठे निर्णय घेतले.

हे निर्णय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारसाठी गेम चेंजर ठरले आहेत. अशा स्थितीत मोदी सरकारच्या काही महत्त्वाच्या निर्णयांवर एक नजर टाकूया. या निर्णयांमुळे लोकांमध्ये भाजपचा पंतप्रधान मोदींवरील विश्वास वाढला आहे. (9 years of Narendra Modi Government)

नोटाबंदी आणि लॉकडाऊनच्या निर्णयाला जनतेचा पाठिंबा:

गेल्या नऊ वर्षांत मोदी सरकार जेव्हा-जेव्हा अडचणीत आले, तेव्हा ते यशस्वीपणे बाहेर पडले. २०१६ मध्ये नोटाबंदीच्या निर्णयावर टीका होत असतानाही भाजपने सर्व निवडणुका जिंकल्या.

तसेच पहिल्या लाटेत कोरोनाच्या काळात सरकारने लॉकडाऊन लावले. दुस-या लाटेत लाखो लोकांचे मृत्यू झाले. त्यावर विरोधकांच्या आक्रमक वृत्तीचा फटका मोदी सरकारला बसला.

असे असतानाही मोदी सरकारने जनतेमध्ये विश्वास टिकवून ठेवला आहे. संकटाच्या प्रसंगी जनतेशी सतत थेट संवाद साधण्याचा लाभ सरकारला मिळाला.

कलम ३७० रद्द करणे:

५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरबाबत मोठा निर्णय घेतला. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केले. या निर्णयासोबतच मोदी सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना केंद्रशासित प्रदेश घोषित केले होते.

अयोध्येचे राम मंदिर:

९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदी सरकारने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी राम मंदिर ट्रस्टची स्थापना केली होती.

इतकेच नाही तर ५ ऑगस्ट २०२० रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या उभारणीसाठी भूमीपूजन आणि पायाभरणी करण्यात आली.

मोदी सरकारने आपले ड्रीम प्रोजेक्ट किंवा सामान्य माणसाशी संबंधित महत्त्वाकांक्षी योजना निर्धारित कालावधीत पोहोचवल्या.

गेल्या ९ वर्षात सरकारला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात यश आले. याची सुरुवात २०१६ मध्ये उज्ज्वला योजनेतून झाली. त्याचा परिणाम पुढील २०१७ च्या यूपी विधानसभा निवडणुकीतही दिसून आला.

नवीन संसद किंवा सेंट्रल व्हिस्टा या एक्सप्रेस हायवेचे बांधकाम पूर्ण करून मोदी सरकार नुसत्या घोषणा करत नाही तर त्या पूर्णही करते असा संदेश दिला गेला.

सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या वितरण प्रणालीतही सुधारणा करण्यात आल्याचा ठसा जनतेमध्ये निर्माण करण्यात सरकार काही प्रमाणात यशस्वीही झाले.

भाजप सरकारला सत्तेत ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सकाळने मतदारांचा कल समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातील 288 विधानसभा आणि 48 लोकसभेच्या मतदार संघात महासर्वेक्षण केले. (Sakal Saam Survey)

या सर्वेक्षणात, 'पंतप्रधान मोदींते ९ वर्षाच्या कार्यकाळातील सर्वात मोठे योगदान कोणते असे मतदारांना वाटते?' असा प्रश्र विचारण्यात आला.

या प्रश्नांमध्ये भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावली, केंद्र सरकारच्या योजना, राम मंदिर, नोटबंदी, ३७० कलम रद्दद करणे, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता, वरीलपैकी सर्व, यापैकी कोणतेही नाही, सांगता येणार नाही असे पर्याय देण्यात आले होते. (Sakal Saam Survey)

या प्रश्नावर मतदारांनी दिलेला कल:

  • भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावली: २०.६%

  • केंद्र सरकारच्या योजना: ४.९%

  • राम मंदिर: १२.९%

  • नोटबंदी: ४.६%

  • ३७० कलम रद्दद करणे: ११%

  • संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता: ३.५%

  • वरीलपैकी सर्व: १२.२%

  • यापैकी कोणतेही नाही: १६.१%

  • सांगता येणार नाही: ९.७%

या प्रश्नावर राज्यातील मतदारांनी दिलेला कल पाहता भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावली आहे असं जास्त मतदारांचं मत आहे. (Narendra Modi Government Nine Years Sakal Survey)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT