Sakal Survey 2024 eSakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey 2024: स्वबळावर की एकला चलो रे? सर्वेक्षणातून महाराष्ट्राच्या जनतेचा भाजपासाठी 'मेसेज'

BJP in Maharashtra Vidhansabha Election: महायुतीतील पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी का हा प्रश्न देखील या सर्वे मध्ये विचारण्यात आला तेव्हा हो असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण ४१% इतके होते.

रोहित कणसे

Maharashtra Prepoll Survey: काही दिवासांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला पुरेसे यश मिळाले नाही. यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार तयारी केली जात आहे. दरम्यान भाजपसोबत महायुतीमध्ये सहभागी झाल्याचा सर्वाधिक फायदा कोणत्या पक्षाला झाला याबद्दल वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या राज्यव्यापी सर्वेक्षणात प्रत्येक पक्षाबद्दलच्या भावना मतदारांनी व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सकाळ पूर्वनिवडणूक सर्वेक्षण

‘सकाळ माध्यम समूहा’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील मतदारांचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने (४८.७ टक्के) आहे तर पक्ष म्हणून प्रथम क्रमांकाची पसंती भाजपला (२८.५ टक्के) आहे. महाविकास आघाडी कायम राहावी असे नोंदवणारे मतदार म्हणतात की महाविकास आघाडीचा सर्वाधिक लाभ काँग्रेसला झालेला आहे तर महायुतीचा सर्वाधिक लाभ शिवसेनेला (एकनाथ शिंदे) झालेला आहे असे नोंदवितात.

सर्वाधिक पसंती मिळवणारे भाजपने विधानसभा निवडणुकीत एकला चलो रेचे धोरण अवलंबले तर त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता या सर्वेक्षणात दिसून आले आहे .

महायुतीतील पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी का हा प्रश्न देखील या सर्वे मध्ये विचारण्यात आला तेव्हा हो असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण ४१% इतके होते. तर ३० % मतदारांनी या प्रश्नाला नकार नोंदवला तर २९े% मतदारांनी याचे उत्तर देता येत नाही अशी प्रतिक्रिया नोंदवली.

यावेळी महायुतीचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला महायुतीत सहभागी झाल्याचा फायदा झाल्याचे सर्वात कमी मतदारांचे म्हणणे आहे. फक्त ८.७ टक्के मतदारांनाच अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला महायुतीत सहभागी झाल्याचा फायादा झाला असे वाटते.

तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बंड करत भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महायुतीचा लाभ झाला असे वाटणारे मतदार सर्वाधिक आहेत. एकूण ३७.२ टक्के मतदारांना एकनाथ शिंदे यांचा भाजपसोबत महायुतीत जाण्याचा फायदा झाला असे वाटते.

भाजपबद्दल बोलायचे झाल्यास २२.९ टक्के मतदारांनी महायुतीचा भाजपला फायदा झाल्याचे म्हटले आहे. तर सर्व घटक पक्षांना महायुतीचा समान फायदा झाला असे वाटणारे ३१.२ टक्के मतदार आहेत.

सर्वेक्षणाची पद्धत-

सर्वेक्षणासाठी संमिश्र संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. राज्यभरातून २८८ विधानसभा मतदारसंघातून ८४५२९ मतदारांशी संवाद साधण्यात आला. सर्वेक्षण करण्यासाठी 'सकाळ'चे दोन हजारांवर सहकारी सहभागी झाले होते.

मतदारांची निवड कशी केली?

मतदारांची निवड करतांना ४८ लोकसभा मतदारसंघांना २८८ विधानसभा मतदारसंघात विभागण्यात आले. शहरी आणि ग्रामीण भागांची विभागणी करण्यात आली. भौगोलिक समतोल राखून संशोधन नमुने निवडण्यात आले. यासाठी स्तरीय यादृच्छिक नमुना (Stratified Random Sampling) पद्धत वापरण्यात आली.

सर्वेक्षणासाठी नमुना पद्धतीने लिंग, वय, आर्थिक उत्पन्न गट, नोकरी-व्यवसाय, शिक्षण, धर्म, जात या स्तरातून नमुना निवडण्यात आला. मतदान केलेल्या मतदारांना प्राधान्य देण्यात आले. महाराष्ट्रभरातून ६८ टक्के पुरुष, ३१ टक्के महिला आणि १ टक्के इतर मतदारांनी सर्वेक्षणात भाग घेतला.

(Maharashtra Legislative Assembly Election Sakal Prepoll Survey 2024)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT