Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey 2024: काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरेंचं नुकसान झालंय का? मविआत सर्वाधिक फायदा कोणत्या पक्षाला?

Maharashtra Vidhansabha Election Pre Poll Survey 2024: सकाळच्या सर्व्हेचे निष्कर्ष हे अनेकांची झोप उडवणारे आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीत या आघाडीची स्थिती कशी राहिल? तसंच मविआत घटक पक्षांमध्ये कोण सरस ठरलाय? आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरेंचं नुकसान झालंय का? याचा कल सकाळच्या सर्व्हेतून समोर आला आहे. यातील निष्कर्ष हे अनेकांची झोप उडवणारे आहेत. (Maharashtra Legislative Assembly Election Prepoll Survey 2024)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पूर्व-निवडणूक सकाळ सर्वेक्षण (Prepoll Survey)

सकाळ माध्यम समुहानं राज्यातील सर्व २८८ मतदारसंघात सर्व्हेक्षण केलं. यामध्ये एकूण ८१,५२९ मतदारांची मतं जाणून घेण्यात आली. यामध्ये ६८ टक्के पुरुष तर ३१ टक्के महिलांचा तसंच १ टक्के इतरांचा समावेश आहे. या मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिला असला तरी या आघाडीत कोणता घटक पक्ष सरस ठरला? याचं उत्तर देताना काँग्रेस या पक्षाचं नाव मतदारांनी घेतलं आहे.

काँग्रेसला ३७.१ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्यानंतर सर्व घटक पक्षांना समान फायदा झाल्याचं ३०.८ टक्के लोकांनी म्हटलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला फायदा झाल्याचं १८.५ टक्के लोकांनी म्हटलं आहे. तर सर्वात कमी फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे. १३.६ टक्के लोकांनी शिवसेनेला कमी फायदा झाल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरे याचं राजकीय नुकसान झालंय का? या प्रश्नावर लोकांनी मत व्यक्त करताना ३१.३ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलंय. तर ४३.३ टक्के लोकांनी ठाकरेंचं नुकसान झालेलं नाही असं म्हटलंय. तर २५.४ टक्के लोकांनी मविआत शिवसेनेला नुकसान झालंय की नाही हे सांगता येणार नाही, असं म्हटलं आहे.

(Maharashtra Legislative Assembly Election Sakal Prepoll Survey 2024)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

SCROLL FOR NEXT