Maharashtra Legislative Assembly Election Prepoll Survey 2024 eSakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey 2024: ठाकरे-पवार-काँग्रेस पडणार भाजपवर भारी! 'या' पक्षाला सर्वाधिक पसंती; सकाळच्या सर्व्हेतून समोर आली धक्कादायक माहिती

Maharashtra Legislative Assembly Election Prepoll Survey 2024: आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला जनतेची पसंती असेल? याची एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Maharashtra MLC Elections Sakal Survey 2024:

आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला पसंती असेल? याबाबत जनतेने कौल दिला आहे. सकाळच्या सर्व्हेमधून ही बाब समोर आली असून यामध्ये सर्वाधिक पसंती ही भाजपला असल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. तसंच महाविकास आघाडीकडं जनतेचा कल असून महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे.

सकाळनं राज्यातील २८८ मतदारसंघात सर्व्हेक्षण घेतलं असून यात ८१,५२९ रँडम सॅम्पल घेण्यात आलं. यामध्ये पुरुषांची संख्या ६८ टक्के, महिला ३१ टक्के तर १ टक्का इतरांचा समावेश आहे. यामध्ये महाविकास आघाडीला जनतेनं पसंती दिल्याचं दिसतं आहे. तर महायुती पिछाडीवर आहे. यामध्ये मतदारांनी आगामी विधानसभेसाठी भाजपला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती मिळाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पूर्वनिवडणूक सर्वेक्षण (Maharashtra Prepoll Survey)

दरम्यान, या सर्व्हेक्षणात ४८.७ टक्के मतदारांचा कल महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे. तर ३३.१ टक्के मतदारांचा कल महायुतीच्या बाजूनं आहे. १३.४ टक्के मतदारांचं यामध्ये अद्याप नेमकं ठरलेलं नाही असं मत नोंदवलं आहे. तर ४.९ टक्के मतदारांनी आपल्या मविआ आणि महायुती यांपैकी कोणीच नको असं म्हटलं आहे.

पक्षांबाबतच्या कलांमध्ये मतदारांनी सर्वाधिक पसंती २८.५ टक्के, त्याखालोखाल काँग्रेसला २४ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १४ टक्के, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ११.७ टक्के त्यानंतर शिवसेना ६ टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस ४.२ टक्के अशी पसंती दर्शवली आहे. याशिवाय इतर पक्षांवर स्थानिकांचा प्रभाव दिसून येतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT