South maharashtra loksabha sakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey Loksabha 2024: साखरपट्ट्यात प्रस्थापितांविरुद्ध नाराजी.. इच्छुकांच्या भाऊगर्दीत दक्षिण महाराष्ट्र कोण जिंकणार?

सध्याच्या परिस्थितीत ‘मविआ’कडे कल दिसत असला तरी अजून आघाडी आणि महायुती यांच्या जागावाटपावर सारी सत्तेची गणिते अवलंबून आहेत.

सकाळ वृत्तसेवा

- निखिल पंडितराव, शेखर जोशी, राजेश सोळसकर

सध्याच्या परिस्थितीत ‘मविआ’कडे कल दिसत असला तरी अजून आघाडी आणि महायुती यांच्या जागावाटपावर सारी सत्तेची गणिते अवलंबून आहेत. प्रस्थापितांविरुद्ध नाराजीचे आव्हान आणि इच्छुकांची भाऊगर्दी यातून महायुती मार्ग कसा काढणार हे उमेदवार ठरल्यावर समोर येईल.

कोल्हापूर

कोल्हापूर मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता अधिक आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीने पक्षासह चिन्हालाही प्रतिष्ठा मिळेल असा दावा आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे हा मतदार संघ काँग्रेसकडे खेचून आणण्यात यशस्वी होतील असे वाटते आहे. महायुतीमध्ये शिवसेनेला(शिंदे गट) कोल्हापूरची जागा मिळाली तर त्यांच्याकडे प्रा. मंडलिक वगळता अन्य प्रबळ उमेदवार नाही.

राष्ट्रवादी(अजित पवार गट) व भाजपकडे ताकदीचा उमेदवार नाही. भाजपकडून समरजीत घाडगे यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या मतदारांनी विश्‍वासाने निवडून दिले, त्यांनाच गृहित धरून राजकीय निर्णय घेतला तर तो लोकांना आवडत नाही. हा कोल्हापूरचा इतिहास आहे. डॉ. चेतन नरके आणि काँग्रेसचे बाजीराव पाटील यांनी येथे प्रचार सुरू केला आहे. नरके यांनी ठाकरे गटाकडून तयारी ठेवली आहे. त्यामुळे ते काय करणार याकडेही लक्ष आहे.

सांगली -

सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दोन वेळा भाजपने विजय मिळवला होता. मात्र २०२४ ला भाजपसाठी विजयाचा मार्ग आव्हानात्मक बनला आहे. भाजपचे खासदार आणि संभाव्य उमेदवार संजय पाटील यांच्याविषयी असलेली पक्षांतर्गत नाराजी हे याचे प्रमुख कारण सांगितले जाते. खासदार पाटील यांच्या विरोधात भाजपकडून सातत्याने वरिष्ठ पातळीवर तक्रारी करण्यात येत होत्या, मात्र तो चक्रव्यूह भेदून त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी मिळेल, अशी व्यूहरचना केलेली आहे. त्यांच्या नावाची घोषणा ही औपचारिकता आहे, असे सांगितले जात आहे.

त्यांचा सामना काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यासोबत होतोय की कालच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात दाखल झालेल्या पैलवान चंद्रहार पाटील यांच्याशी होतोय, हे पहावे लागेल. महाविकास आघाडी यावेळी भाजपला काँटे की टक्कर देईल, असे वातावरण आहे. विशाल पाटील यांनी गेल्या सहा महिन्यापासून मतदार संघात बांधणी केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रबळ नेते आमदार विश्‍वजीत कदम यांच्याशी असलेला छुपा संघर्ष संपवून त्यांना आपले नेते म्हणून जाहीर केले आहे.

हातकणंगलेत थेट की तिरंगी

हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. परंतु ते महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यासमवेत जाणार अशीही चर्चा सुरू आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनीही प्रचार सुरू केला आहे, त्यात भाजपने आमदार विनय कोरे यांच्यासाठीची चाचपणी सुरू केली आहे. यामुळे धैर्यशील माने विरुद्ध शेट्टी अशी थेट लढत होणार की तिरंगी लढत पाहायला मिळणार हे भाजपवर अवलंबून असणार आहे. या मतदार संघात गेल्यावेळी वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर निर्णायक ठरला होता. यावेळी ही तो काय चाल खेळणार यावर विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत.

सातारा -

सातारा मतदारसंघातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याने अद्यापही उमेदवार निश्चित नाहीत. भाजप आणि राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) जे उमेदवार चर्चेत आहेत, त्यावरून लोकांनी हा कल दिलेला आहे. वास्तविक, अजित पवार यांनी आधीपासूनच या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपही हा मतदारसंघ सोडायला तयार नाही. शिवाय, शिवसेनेतील (शिंदे गट) स्थानिक नेत्यांच्या मते हा मतदारसंघ मूळचा शिवसेनेचा आहे. त्यामुळे तो यावेळी शिवसेनेला द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. यावेळी उदयनराजेंची ताकद महायुतीतील घटक पक्षांमुळे आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे वाढल्याचे दिसते.

त्या जोरावरच त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. उदयनराजेंना उमेदवारी मिळाल्यास अजित पवार गट आणि शिवसेनेच्या शिंदे गटाची रसद त्यांना मिळणार आहे. इकडे राष्ट्रवादीतील फुटीमुळे श्रीनिवास पाटील यांची ताकद काहीशी कमी झाल्याचे दिसत असले, तरी कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या मतदारसंघात त्यांचे वर्चस्व राहील. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला उमेदवारी मिळाल्यास आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे त्यांचे उमेदवार असतील. पाटील बंधूंची स्वतःची ताकद आणि महायुतीतील घटक पक्षांची रसद या जोरावर नितीन पाटील चांगली लढत देऊ शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT