Sakal Survey Loksabha 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey Loksabha 2024: सेनेचं मतदान घटणार... पण ठाकरेंना होणार फायदा! शिंदेंच काय? 'सकाळ'च्या सर्व्हेत मोठी माहिती समोर...

Maharashtra election survey for 2024: लोकसभा निवडणुकांच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत. मात्र प्रचाराला जोरदार सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकांचा कल 'सकाळ'ने सर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेतल्या.

Sandip Kapde

Sakal Survey Lok Sabha Election 2024:

राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचे राज्य मानले जाते. लोकसभेत महाराष्ट्रातून ४८ खासदार नेतृत्व करतात. आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून जाहीर सभांमधून प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत. मात्र प्रचाराला जोरदार सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकांचा कल 'सकाळ'ने सर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेतला.

'सकाळ'ने केलेल्या सर्व्हेतून मोठी माहिती समोर आली आहे. २०१९ पेक्षा शिवसेनेचं मतदान घटणार आहे. जरी एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली तरी देखील त्यांना फटका बसणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा मोठा फायदा होणार आहे.

शिवसेनेला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २३.५ टक्के मतं मिळाली होती. त्यावेळी शिवसेना-भाजप एकत्र लढले होते. भाजपला २७.८४ टक्के मतं मिळाली होती. आता शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. राजकीय महत्त्वाकांक्षा, डावलले जाण्याचे दु:ख, पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील नाराजी यातून एकनाथ शिंदे यांनी २१ जून २०२२ रोजी शिवसेनेत मोठा बंड केला. त्यानंतर शिवसेनेचे दोन गट झाले.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट निर्माण झाले. आधी निवडणूक आयोगाने नंतर विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली. शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण देखील एकनाथ शिंदेना देण्यात आले. त्यामुळे ऐणारी लोकसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई देखील असणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केला तेव्हा अनेक खासदारांनी देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नवीन चिन्ह आणि नवीन उमेदवारांसह मैदानात उतरणार आहेत.

सकाळच्या सर्वेमध्ये काय निष्कर्ष?


'सकाळ'ने केलेल्या सर्व्हेतून शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ४.९ टक्के मतदान मिळेल. तर शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना १२.५ टक्के मतदान मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेना ठाकरेंपेक्षा ७.६ टक्के मागे असेल.


सर्वेक्षणाची रूपरेषा-


सकाळेने केलेल्या सर्व्हेत ४८ लोकसभा मतदारसंघ विधानसभा निहाय विभागून यादृच्छिक पद्धतीने नमुना निवड (रॅन्डम सॅम्पलिंग) करण्यात आली आहे. याअंतर्गत लिंग, वय, जात, धर्म, कुटुंबाची आर्थिक स्थिती, वेगवेगळे उत्पन्न गट, सरकारी योजनांचे लाभार्थी, नव मतदार असे निकष निश्चित केले होते.

सर्वेक्षणात २०२४ च्या उमेदवारांबद्दल कल समजून घेण्यात आलेला नाही. मात्र सर्वेक्षण सध्याच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल कल सांगणारे आहे. त्यामुळे उमेदवार घोषित झाल्यावर, स्थानिक युती - आघाडीचे गणित निकालावर परिणाम करणारे ठरेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

SCROLL FOR NEXT