sakal survey esakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey : पक्ष फोडून सत्तेत जाण्याची बंडोबा संस्कृती महाराष्ट्राला मान्य होईल? वाचा जनतेचा कौल?

सकाळ सर्वेक्षणातून लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे समोर आली आहेत.

दत्ता लवांडे

Sakal Survey : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केलं आणि सत्तेत सहभागी झाले. त्यांना उपमुख्यमंत्रीपद तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ८ मंत्र्यांना मंत्रीपदे मिळाले. तर बरोबर एका वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेनेत बंड झालं होतं.

त्यानंतर आता विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण असे अनेक प्रश्न जनतेला पडले आहेत. आपल्या मनातील या सर्व प्रश्नांबद्दल जनतेला काय वाटतं यावर सकाळ माध्यमाने सर्वेक्षण केलं आहे. महाराष्ट्रातील ७३ हजार ३३० लोकांचा कल घेण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील महिला आणि पुरूष मतदारांचे मत घेण्यात आले आहेत.

फोडाफोडीच्या राजकारणानंतर 2024 विधानसभा निवडणुकीत कौल कोणाला? २०२४ विधानसभा निवडणुकीत CM कोण होणार? शरद पवार विरुद्ध अजित पवार: कोणाची बाजू योग्य? वेगळा गट करून सत्तेत सहभागी होण्याचा पायंडा मान्य आहे का? शरद पवारांना सहानुभूतीचा फायदा होईल का? लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र झाल्यात एकाच पक्षाला मत देणार का? या सर्व प्रश्नांवर जनतेने आपली मत मांडली आहेत.

वेगळा गट करून सत्तेत सहभागी होण्याचा पायंडा मान्य आहे का?

पक्षातून वेगळा गट करून सत्तेत सहभागी होण्याचा पायंडा जास्तीत जास्त लोकांना मान्य नसल्याचं या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. ७४ हजार ३३० मतदारांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यापैकी जवळपास ८०.९ टक्के जनतेला हा पायंडा मान्य नसून १९.१ जनतेने यासाठी सहमती दर्शवली आहे.

निवडणुकीनंतर पक्षांतर करणाऱ्या आमदारांबद्दल जनतेचं मत

पक्षांतर करणाऱ्या आमदारांबद्दल जनतेमध्ये असंतोष असून जास्तीत जास्त लोकांनी थेट निशाणा साधला आहे. या प्रश्नावर ७३ हजार ३१२ मतदारांनी मते नोंदवली असून "पक्षांतर करणाऱ्या आमदारांनी आमदारकीचा राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवावी" असं मत ३८.७ टक्के जनतेने व्यक्त केलं आहे. "नेत्यांची राजकीय अपरिहार्यता मान्य आहे असं म्हणणारे" १३.३ टक्के लोकं आहेत. तर ३०.१ टक्के लोकांचं "कायमस्वरूपी निवडणूक लढवण्यावर बंदी आणावी" असं मत आहे.

शिवसेना पक्ष (शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही गट) सत्तेत यावा असे मानणाऱ्या मतदारांचा कल:

आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असं 39 % मतदारांचे मत आहे तर या शिवसेनेच्या फुटीर आमदारांवर कायमस्वरूपी निवडणुक लढविण्यावर बंदी आणावी असं 33% लोकांचा म्हणणं आहे. नेत्यांची राजकीय अपरिहार्यता मान्य आहे असं 12 % मतदारांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT