Maharashtra Political Rebellion sakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey : पुणे : कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींवर भिस्त

ज्येष्ठ नेते शरद पवार म्हटले की, आपसूकच पुण्याचे नाव पुढे येते. त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा शहर- जिल्ह्यातून झाला.

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

ज्येष्ठ नेते शरद पवार म्हटले की, आपसूकच पुण्याचे नाव पुढे येते. त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा शहर- जिल्ह्यातून झाला, त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे शहरात झाले आणि त्यांचे वास्तव्यही पुण्यातच असते. मुंबई, दिल्लीबरोबरच त्यांचा सर्वाधिक वावरही पुण्यातच असतो. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत येथेही राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत मोठी उलथापालथ झाली आहे. बहुतांश लोकप्रतिनिधी अजित पवारांकडे तर अनेक कार्यकर्ते शरद पवारांकडे अशी विभागणी झाली आहेत.

पुणे जिल्ह्याची राजकीय सूत्रे दीर्घकाळ शरद पवार यांच्याकडे होती. टप्प्याटप्याने त्यांनी जिल्ह्याची सूत्रे अजित पवार यांच्याकडे सोपविली. गेल्या २३ वर्षांत अजित पवार अनेकदा मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. ते पुण्याचे पालकमंत्रीही होते. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क वाढत गेला.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच साखर कारखाने, जिल्हा बॅंक, दूध संघ आदी संस्थांवरील नियुक्त्यांमध्ये अजित पवारांना सर्वाधिकार मिळाले. सत्तेचे अथवा पक्षातील पद मिळण्यासाठी कार्यकर्ते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे गेले तरी, अजितदादांशी बोलून घ्या, असा सल्ला त्यांना मिळू लागला. मिळालेल्या संधीचा अजित पवार यांनीही पुरेपूर वापर केला.

जिल्ह्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखू लागले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ते पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत फिरले. सर्वच स्तरांत संपर्क प्रस्थापित केला. जिल्ह्यातील दोन्ही महापालिकांत राष्ट्रवादी काँग्रेसची दीर्घकाळ सत्ता असल्यामुळे त्यांनीही अनेक कार्यकर्त्यांना संधी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाल्यावर सत्तेच्या पदांवर असलेल्या आणि ती पदे मिळविण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी अजित पवार यांच्याकडे धाव घेतली. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे महापालिका, जिल्हा परिषदेची प्रभाग रचना यावर त्यांचा प्रभाव असू शकेल, ही शक्यताही त्यासाठी कारणीभूत ठरली. मात्र, शरद पवार यांच्यामुळे संधी मिळालेला आणि घडविलेला सत्तेतील, पक्षसंघटनेतील एक वर्ग असून तो त्यांच्याबरोबर आहे.

शरद पवारांबरोबर एक खासदार व दोन आमदार

राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण शरद पवारांसोबत आहेत. आमदार अशोक पवार (शिरूर), चेतन तुपे (हडपसर) हे आमदारही त्यांच्याबरोबर आहेत. आमदार अतुल बेनके (जुन्नर) यांनी तटस्थ असल्याचे सांगितले असले तरी, त्यांचा कल अजित पवारांकडे असेल, असे बोलले जाते.

अजित पवारांकडे ओढा

जिल्ह्यातील राजकारणाचा आढावा घेतला दहा आमदरांपैकी दिलीप वळसे पाटील (आंबेगाव) दत्तात्रेय भरणे (इंदापूर), दिलीप मोहिते (खेड), सुनील शेळके (मावळ) सुनील टिंगरे (वडगाव शेरी), अण्णा बनसोडे (पिंपरी) हे आमदार अजित पवार यांच्याकडे आहेत. जिल्ह्यातील १३ पैकी सात-आठ तालुक्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी अजित पवारांवर विश्वास दाखविला आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील बहुतांश माजी महापौर, उपमहापौर, तसेच माजी नगरसेवकांचाही कल अजित पवारांकडे आहे. जिल्हा परिषदेतही अशीच स्थिती आहे. पुण्यात दीपक मानकर यांना शहराध्यक्ष करण्यात आले आहे. जिल्हा आणि पिंपरी चिंचवडच्या नियुक्त्या मात्र अद्याप प्रलंबित आहेत.

कार्यकर्त्यांचा थोरल्या पवारांवर विश्‍वास

सत्तेपासून दूर असलेला आणि पक्षावर प्रेम असलेला, पक्षसंघटनेशी संलग्न वर्ग राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही आहे. शरद पवार यांनी पुण्यातून पक्षाचा विस्तार करून तो राज्यभर पसरविला. त्यामुळे त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा गट आहे. त्यामुळेच अजित पवारांची लोकप्रतिनिधींवर तर शरद पवारांची मतदारांवर भिस्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT