Jayant Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey : कार्यकर्त्यांचा प्रतिसाद हेच भांडवल

राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड झाली असली तरी ७० ते ८० टक्के पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्ते आजही आमच्या सोबत आहेत.

शांताराम पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड झाली असली तरी ७० ते ८० टक्के पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्ते आजही आमच्या सोबत आहेत. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र राहावा अशीच माझी भूमिका आहे, असे मत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. पक्षफुटीनंतर त्यांच्याशी ‘सकाळ’चे इस्लामपूरचे प्रतिनिधी शांताराम पाटील यांनी साधलेला संवाद.

प्रश्‍न - अजितदादा म्हणतात, शरद पवार आम्हाला खासगीत एक बोलायचे व बाहेर एक सांगायचे. हे खरे आहे का?

जयंत पाटील - शरद पवार यांनी माझ्यासमोर तरी अशी कोणतीही भूमिका घेतलेली नाही आणि पक्ष म्हणूनही या बाबत मला काही बोलले नाहीत. अजितदादा म्हणतात त्याप्रमाणे त्या दोघांमधील अंतर्गत काही संवाद असेल तर तो मला माहीत नाही. त्यांनी आमच्या समोर अशी कधीही पक्षाची भूमिका घेतलेली मला तरी आठवत नाही.

सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय जबाबदारी दिली, त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष फुटला का?

हे साफ चुकीचे आहे. कारण सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय जबाबदारी देण्यासाठी अजितदादा यांचा विरोध नव्हता. त्यांना पक्षाचे कार्याध्यक्ष करण्यासाठी अजितदादांची सहमती होती. त्यामुळे सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष झाल्यामुळे पक्ष फुटला असे म्हणता येणार नाही.

‘राष्ट्रवादी’चे जे लोक पक्ष सोडून गेले त्यांना जयंत पाटील यांनी वाव दिला नाही, असा त्यांचा आरोप आहे.

असे काहीही नाही. सोडून जाताना काही तरी कारणे द्यायची असतात. त्यामुळे त्यांनी माझे कारण दिले असेल, मात्र मी गेली २४ वर्षे पक्षात जबाबदारीने काम करीत आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची माझी नेहमीच भूमिका असते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या माझ्या पाच वर्षांच्या काळात काही निवडी थांबल्या असे म्हटले जाते, यात कोणतेही तथ्य नाही. ओबीसी अध्यक्ष निवडताना त्याला छगन भुजबळ यांचा विरोध होता. त्यामुळे ती निवड रखडली होती. शेवटी ती निवड झाली.

या उलट गेल्या पाच वर्षांत ज्या ठिकाणी आमच्या पक्षाने उमेदवार दिले नव्हते, अशा अनेक मतदारसंघातही मी जाऊन तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष मजबुतीसाठी काम केले आहे. लोकांना सक्रिय करुन पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोचवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे. त्यामुळे माझ्यावर नाराजी असायचे कोणतेही कारण नाही.

येथून पुढे शरद पवार गट म्हणजे तुमची वाटचाल कशी असेल?

राज्यभरात आमचे नेते शरद पवार यांना मानणारा मोठा गट आहे. अजूनही विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश व राज्यातील कानाकोपऱ्यातील ७० ते ८० टक्के पक्षाचे कार्यकर्ते शरद पवार यांच्यासमवेत आहेत. तो प्रतिसादच आमचे भांडवल आहे. त्यामुळे या प्रसंगातूनही आम्ही या कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्षाची मजबूत बांधणी करून जोमाने कामाला लागू.

तुम्हाला शिवसेनेचे हिंदुत्व चालते, मग भाजपचे का नाही?

शिवसेनेचे हिंदुत्व व भाजपचे हिंदुत्व दोन्ही वेगवेगळे आहेत, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. आता तो मुद्दाही फार मागे पडला आहे. त्यामुळे हिंदुत्व या मुद्द्यापेक्षा राज्यातील या घडामोडी व फोडाफोडीला अधिक महत्त्व आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT